श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर : काही नास्तिकवादी आणि अन्य पुरो(अधो)गामी महिला संघटनांनी मंदिर देवस्थानला पत्र देऊन आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे. त्यावर मंदिर प्रशासनाने गर्भगृहामध्ये महिलांना प्रवेश न देण्याची घेतलेली भूमिका अत्यंत योग्य आहे.
श्री त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा, ही मागणी करणे चुकीचे आहे. आपल्या धर्मपरंपरा, प्रथा आणि रूढी या चालूच राहिल्या पाहिजेत. त्यांचे रक्षण करण्यासाठी आमचा पाठिंबा आहे, असे प्रतिपादन नाशिक येथील शिवसेनेचे खासदार श्री. हेमंत गोडसे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिक्षा कोरगावकर यांनी त्यांची भेट घेतली, त्या वेळी ते बोलत होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात