गणेशोत्सव आदर्शरित्या आणि राष्ट्र-धर्म हितरक्षणाच्या उद्देशाने साजरे करण्याचा उत्सव मंडळांचा निर्धार !
पुणे : गणेशोत्सव आदर्शरित्या साजरा व्हावा, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ५ ऑगस्ट या दिवशी कलाप्रसाद मंगल कार्यालयात ‘सार्वजनिक उत्सव समन्वय शिबीर’ आयोजित करण्यात आले. या शिबिरात पुण्याच्या विविध भागांतील गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या वेळी सर्व गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव आदर्शरित्या आणि राष्ट्र-धर्म हितरक्षणाच्या उद्देशाने साजरा करण्याचा निर्धार केला. गणेशोत्सवाचे पावित्र्य राखले जावे, यासाठी आणखी काय प्रयत्न करता येतील, याविषयी गटचर्चाही झाली.
जळगाव येथे सार्वजनिक उत्सव समन्वय शिबीर !
जळगाव : येथील सनातनच्या सेवाकेंद्रात सायंकाळी ४.३० ते ७.३० या वेळेत ‘सार्वजनिक उत्सव समन्वय शिबीर’ पार पाडले. या वेळी नवरात्र मित्र मंडळाचे ह.भ.प. देवदत्त मोरदे महाराज, सनातन संस्थेचे श्री. दत्तात्रेय वाघुळदे, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. क्षिप्रा जुवेकर आणि श्री. प्रशांत जुवेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.