बांगलादेशातील ही असहिष्णुता भारतातील पुरो(अधो)गाम्यांना दिसत नाही का ? याविषयी बरखा दत्त, सागरिका घोष यांसारख्या महिला पत्रकार का बोलत नाहीत ?
ढाका : बांगलादेशामधील खाग्राछारी जिल्ह्यातील दिघीनाला येथे काही धर्मांधांनी ९ वर्षीय हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या केली. २९ जुलै या दिवशी ही घटना घडली. या मुलीच्या गुप्तांगासह इतर ठिकाणीही चाकूने भोसकून तिचा देह छिन्नविछिन्न करण्यात आला. या प्रकरणी मुलीच्या आईने दिघीनाला येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी दुसर्याच दिवशी शाह आलम, नझरूल इस्लाम आणि मुनीर हुसेन या तिघांना अटक केली. पोलीस इतर आरोपींचा माग काढत आहेत.
१. सदर अल्पवयीन हिंदु मुलगी ही नोईमैल शासकीय प्राथमिक शाळेत ४ थ्या वर्गात शिकत होती. तिचे वडील ५ वर्षांपूर्वीच वारल्याने ती आईसोबत रहात होती. ती शाळेतून दुपारच्या जेवणाच्या सुटीत घराकडे येण्यास निघाली. तेव्हा तिचे अपहरण करण्यात आले.
२. सायंकाळी तिची आई ओनुमती त्रिपुरा कामावरून परत आल्यावर तिला मुलगी घरी दिसली नाही म्हणून तिचा शोध घेण्यास प्रारंभ केला. नंतर पोलिसांच्या साहाय्याने शोधाशोध केली असता मुलीचा मृतदेह घरापासून १५० फुट अंतरावर एका निर्जन झुडुपात सापडला.
३. या घटनेनंतर शासनाच्या अनेक वरिष्ठ अधिकार्यांनी आणि नेत्यांनी घटनास्थळी आणि पीडितेच्या कुटुंबास भेट दिली.
४. सदर मुलगी घरी येते, त्याच सुमारास तिच्या घरासमोर एक ट्रक आणि ४-५ युवक काही लोकांच्या दृष्टीस पडले होते. ते या मुलीच्या घराची टेहळणी करत होते.
५. या घटनेने येथे प्रचंड जनक्षोभ उसळला आणि येथील नागरिकांनी निदर्शने करून महामार्गावरील वाहतूक बंद पाडली. विविध संघटनानी मोर्चे काढून निषेध व्यक्त केला. अनेक महाविद्यालये आणि विश्वविद्यालये येथील विद्यार्थ्यांनी मोर्च्यांचे आयोजन केले आणि मानवी साखळी सिद्ध करून आणि मेणबत्ती पेटवून घटनेविषयी सरकारचे लक्ष वेधून घेतले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात