आगरा : भारतात धर्मनिरपेक्ष शासनपद्धत कधीही नव्हती. त्रेतायुगातील राजा हरिश्चंद्र, प्रभु श्रीराम, द्वापरयुगातील महाराज युधिष्ठिर, कलियुगातील सम्राट चंद्रगुप्त, छत्रपती शिवाजी महाराज, विजयनगरचे कृष्णदेवराय, अफगाणिस्तानचा राजा दाहीर आणि राजस्थानचे महाराणा प्रताप आदी सारे धर्मनिरपेक्ष राजे नव्हते. या सर्व राजांची राज्ये हिंदु राष्ट्र होती. स्वातंत्र्याच्या वेळी ५६३ राजसंस्थाने हिंदु पद्धतीने राज्यव्यवहार करत होती. वर्ष १९४७ मध्ये भारत हिंदु राष्ट्र होते. वर्ष १९७६ मध्ये इंदिरा गांधींनी भारताला धर्मनिरपेक्ष घोषित केले. या धर्मनिरपेक्ष लोकशाहीने भारताची आणि हिंदूंची मोठ्या प्रमाणात हानी केली असल्याने भारताला पुनश्च हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी कृतीशील हिंदूंनी अन् हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संघटित कार्य करण्याची आज आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी येथे आयोजित हिंदूसंघटन बैठकीमध्ये केले.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे आगरा समन्वयक श्री. ठाकूर सिंह यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम लुकतुके हेही उपस्थित होते. या बैठकीला आगरा येथील विविध हिंदू संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रत्येक १५ दिवसांनी हिंदु संघटनांनी हिंदूसंघटन बैठक घेण्याचे निश्चित केले.
आगरा येथे हिंदू युवा वाहिनीच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग
आगरा : येथे आयोजित हिंदू युवा वाहिनीच्या १५ ऑगस्टनिमित्त होणार्या तिरंगा यात्रेच्या संदर्भातील बैठकीत हिंदु जनजागृती समितीने सहभाग घेतला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम लुकतुके आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी मार्गदर्शन केले.
१. श्री. चेतन राजहंस यांनी या वेळी हिंदु युवकांमध्ये शौर्य जागरण या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापले त्या वेळी महाराष्ट्रात ५ इस्लामी राज्ये म्हणजे आजच्या भाषेत इस्लामिक स्टेट्स होती. त्यांना पराजित करण्याचे धैर्य महाराजांनी दाखवले. असे कर्तृत्व हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आपल्यासारख्या युवकांना दाखवायचे आहे.
२. श्री. श्रीराम लुकतुके म्हणाले, वर्तमान लोकशाही व्यवस्थेमध्ये तिरंगा यात्रा मोहोल्ल्यांंमधून काढण्यास बंदी घातली जाते. उत्तरप्रदेशच्या कासगंजमध्ये चंदन गुप्ता सारखा धर्मप्रेमी भारतमाता की जय अशी घोषणा देतो, तेव्हा भाजपचे मंत्री विचारतात की, मोहल्ल्यांमध्ये अशा घोषणा का देण्यात आल्या ? म्हणूनच हिंदू युवकांनी तिरंगा यात्रा काढतांनाच अशा प्रकारच्या स्वार्थी आणि राष्ट्रघातकी राजकीय नेत्यांना घरी बसवण्याचाही संकल्प केला पाहिजे. मुळात अशा प्रवृत्तीचे शासनकर्ते देशाचे हित कधीही साधू शकत नाहीत; म्हणून देशभक्त आणि धर्मप्रेमी शासनकर्ते मिळणारे हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी सक्रीय झाले पाहिजे.
कोसीकलान (उत्तरप्रदेश) येथे हिंदूसंघटन बैठक
वर्तमान ‘धर्मनिरपेक्ष’ लोकशाही व्यवस्थेमध्ये हिंदूंचे कल्याण अशक्य ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
कोसीकलान (उत्तरप्रदेश) : राजकीय परिवर्तन किंवा कोण्या एखाद्या राजकीय पक्षाचे सरकार यांमुळे हिंदु समाजाचे कल्याण आणि रक्षण होणार नाही. विद्यमान धर्मनिरपेक्ष लोकशाहीची रचनाच मूळ हिंदुविरोधी आणि अल्पसंख्यांकप्रेमी आहे. भारतीय राज्यघटनेद्वारे अल्पसंख्यांकांना संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या राज्यव्यवस्थेत योगी किंवा मोदी असे कोणी हिंदु नेते जिंकून आले, तरी ते हिंदूंचे कल्याण करू शकत नाहीत. हिंदूंचे कल्याण होण्यासाठी हिंदूंना ‘धर्मनिरपेक्ष’ लोकशाही नको, तर धर्माधारित हिंदु राष्ट्रच हवे आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी येथे ‘दिनदयाळ उपाध्याय स्मृती मंचा’द्वारे आयोजित हिंदूसंघटन बैठकीत केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा परिचय समितीचे श्री. श्रीराम लुकतुके यांनी करून दिला. या बैठकीनंतर प्रत्येक १५ दिवसांनी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याचे निश्चित करण्यात आले.