कळंबोली (पनवेल) : आपण जात, प्रांत, पंथ यांत विभागलो गेलो आहोत आणि असंघटित आहोत. आपण आता हिंदु म्हणून एकत्र यायला हवे. आपल्या मुली धर्मशिक्षण नसल्यामुळे ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत. आपल्या मुलांना लहानपणापासून धर्मशिक्षण द्यायला हवे, हाच यावरती उपाय आहे. आपला इतिहास आपल्या मुलांना शिकवायला हवा तरच आपल्या राष्ट्राचे आणि धर्माचे रक्षण होऊ शकते, असे प्रतिपादन सत्यम रुग्णालयाचे डॉ. संजय बर्नवाल यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिरा’त बोलत होते. ५ ऑगस्ट या दिवशी झालेल्या या शिबिराचे उद्घाटन सनातनच्या सौ. मोहिनी मांंढरे आणि हिंदु विधीज्ञ परिषदेच्या सौ. किशोरी कुलकर्णी आणि डॉ. संजय बर्नवाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या शिबिराला पनवेल, नवीन पनवेल, कामोठे आणि कळंबोली या परिसरातील विविध सार्वजनिक उत्सव मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रत्येक पंधरा दिवसांनी भेटून पुढील दिशा ठरवायची आणि हिंदु राष्ट्राचा विचार सर्व मंडळांपर्यंत पोहोचवायचा, असे या वेळी ठरवण्यात आले.
शिबिराचा उद्देश स्पष्ट करतांना सनातनच्या सौ. मोहिनी मांढरे म्हणाल्या की, सार्वजनिक उत्सवात होणारे अपप्रकार थांबवून, उत्सवांचे पावित्र्य राखून धर्मशास्त्रानुसार योग्य पद्धतीने सार्वजनिक उत्सव सर्वत्र आदर्शरित्या साजरे करूया. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी ‘आपण आदर्श उत्सव कसे साजरे करावेत ?’ याविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, ‘समाजाला काय आवडते यापेक्षा समाजाला काय आवश्यक आहे’, हे सांगणे आणि उत्सवातील अपप्रकार रोखणे हे आपले कर्तव्य आहे.
हिंदूंंच्या उत्सवांवरील निर्बंधाचे षड्यंत्र हाणून पाडा ! अधिवक्त्यासौ. किशोरी कुलकर्णी, हिंदु विधीज्ञ परिषद
गेल्या अनेक वर्षांपासून मोगल आणि इंग्रज यांनी हिंदु धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आजही विविध माध्यमांतून हिंदुविरोधक यासाठी प्रयत्नरत आहेत. हिंदूंच्या उत्सवांना लक्ष्य करणे, हा याच षड्यंत्राचा भाग आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव यांमध्ये प्रदूषण होते, याचा कांगावा करणारे नद्यांत सोडले जाणारे सांडपाणी, रसायनमिश्रीत पाणी, अनधिकृत भोंगे आदी माध्यमांतून होणार्या प्रदूषणाविषयी मात्र मौन बाळगतात.
गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेऊन सुराज्य आणण्यासाठी प्रयत्न करावा ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
लोकमान्य टिळकांनी उत्सवाचा आरंभ राष्ट्र आणि धर्म जागृती करण्यासाठीच केला. पारतंत्र्याप्रमाणेच आज स्थिती आहे. मंडळांनी पुढाकार घेऊन आपण आता सुराज्य आणण्यासाठी म्हणजेच हिंदु राष्ट्र आणण्यासाठी पुढाकार घेऊन प्रयत्न करायला हवेत. राष्ट्र आणि धर्म जागृती करण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आपल्याला सदैव साहाय्य करील.
मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार
१. श्री. संतोष मोकल, शहर संयोजक बजरंग दल आणि राममंदिर विश्वस्त – आमचा देव आपल्या मुलांना कळावा म्हणून रामनवमीचा मोठा उत्सव साजरा करायला आरंभ केला. शिकलेल्या मुलांना आपला धर्मग्रंथ कोणता आहे, हेपण माहिती नाही, ही आपली स्थिती आहे. आपल्याला याविषयी या माध्यमातून जागृती करायची आहे. आता मावळे बनून कार्य करावे लागणार आहे.
२. श्री. तेजस सोनावणे, अध्यक्ष, शिवजयंती उत्सव मंडळ – ज्या राजांनी आमच्या धर्माचे रक्षण केले, त्या राजांची ओळख येणार्या मुलांना व्हायला हवी; म्हणून आम्ही हा उत्सव चालू केला. आता अनेक मंडळे यात स्वत:हून सहभागी होत आहेत. म्हणजे कुणीतरी पुढाकार घेतला, तर हिंदु समाज संघटित होतो. आता आम्ही शिवरायांचे मावळे बनून हे अविरतपणे चालू ठेवणार आहोत.
३. श्री. महेश डोंगरे, शिवजयंती उत्सव मंडळ, खिडूकपाडा – आमच्या राजांचा इतिहास आमच्या मुलांना माहीतच नाही. त्याविषयीची जागृती या माध्यमातून आम्ही चालू केली. समाजात काही मंडळी राजांचा चुकीचा इतिहास सांगतात, हे फार चुकीचे आहे. खर्या इतिहासाची जाणीव समाजाला व्हावी, यासाठी हा उत्सव मोठ्या प्रमाणात आम्ही साजरा करतो.
४. सौ. अमिता चौहान, अध्यक्षा, नारीशक्ती फाऊंडेशन – आपल्या मुलांना प्रथम धर्मशिक्षण द्यायला हवे. त्यांना धर्माचे काहीच ज्ञान नाही. त्यामुळे मग ती निधर्मी होतात. यासाठी आपण अशा धार्मिक कार्यक्रमात अपल्या मुलांना आवर्जून आणायला हवे, तर मुलांना आपला धर्म कळेल.
५. श्री. दत्ता पाटील, कार्यवाह, नववर्ष स्वागत समिती, कामोठे – आपल्या नवीन पिढीला हिंदु धर्माचे नवीन वर्षच माहिती नाही. आज ख्रिस्त्यांचे नववर्ष अगदी मोठ्या प्रमाणात साजरे करतात. आपण हिंदु आहोत याचाच विसर आज आम्हाला पडला आहे. फेरीच्या माध्यमातून हिंदु संस्कृतीची जाणीव समाजाला व्हावी आणि आपण हिंदु आहोत, याचा अभिमान जागृत व्हावा यासाठी या फेरीचे आयोजन करतो.
0 Comments