श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर : नास्तिकतावादी भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी भाविकांच्या भक्तीचे निमूर्लन करण्याचा प्रयत्न चालवला आहे. पुरो(अधो)गाम्यांचे आंदोलन आणि त्यांच्याकडून दिल्या जाणार्या कोणत्याही प्रलोभनांना हिंदु भाविकांनी बळी पडू नये. भूमाता ब्रिगेडने वैदिक सनातन धर्माच्या श्रद्धेला दुखावण्याचा प्रयत्न करू नये. शासन, पोलीस आणि प्रशासन या सर्वांना वेठीस धरण्याचा हा प्रयत्न आहे. श्री त्र्यंबकेश्वरच्या धर्मपरंपरा रक्षणासाठी आम्ही सक्रीय सहभागी होऊ, असे मार्गदर्शनपर प्रतिपादन षड्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांनी केले.
स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांची त्यांच्या आश्रमात हिंदुत्ववाद्यांनी हिंदु धार्मिक परंपरा रक्षण अभियानाची माहिती देण्यासाठी भेट घेतली. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते. या वेळी नगराध्यक्षा सौ. विजया लढ्ढा, गटनेते श्री. योगेश तुंगार, प्रतिष्ठीत बांधकाम व्यावसायिक श्री. दीपक लढ्ढा, सनातन संस्थेच्या सौ. सुनीता पाटील, सौ. नयना भगत, हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिक्षा कोरगावकर आदी उपस्थित होते.
भूमाता ब्रिगेडच्या मागे कोणतीतरी बाहेरील शक्ती
स्वामी सागरानंद सरस्वती महाराज भूमाता ब्रिगेडविषयी म्हणाले की, ब्रिगेडच्या महिलांचा जन्म नक्की भारतात झाला आहे कि विदेशात ? त्यांना भारतीय संस्कृतीचा अभ्यास नाही का ? त्यांच्या मागे कोणीतरी बाहेरील शक्ती असून ती वैदिक हिंदु संस्कृतीला छेद देण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्र्यंबकेश्वर येथील साधू समाज, भाविक जनता आणि ग्रामस्थ यांना वाटते. भारतीय संस्कृतीत महिलांना देवीचे रूप मानले आहे. वैदिक ग्रंथांनुसार प्रत्येक युद्धात राक्षस, दैत्य आणि नास्तिक यांचा संहार करण्यासाठी आदिशक्तीने अवतार घेतला आहे. ब्रिगेडच्या माहिलांना याची आठवण करून द्यावी लागेल. अशा महिलांपासून समाजातील सर्वांनी सावध रहावे.
सोमनाथ मंदिरात केवळ एकाच पुजार्याला पूजा करण्याचा अधिकार
भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी कोणत्याही ठिकाणी देवाची पूजा-अर्चा करण्याचा हट्ट कोणत्याही महिलेने अद्यापपर्यंत केलेला नाही. सोमनाथ मंदिरात केवळ एकाच पुजार्यालाच पूजा करण्याचा अधिकार आहे. मंदिराचे विश्वस्त किंवा शंकराचार्य यांनाही गाभार्यात प्रवेश दिला जात नाही, असेही स्वामीजींनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात