राष्ट्रासाठी तत्परतेने कृतीशील होणारे जिल्हाधिकारी सर्वत्र हवेत !
अमरावती : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. खुशालसिंह परदेसी, पोलीस आयुक्त श्री. दत्तात्रय मंडलिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या वतीने प्रशासकीय अधिकारी श्री. मनवर, तसेच पोलीस अधीक्षक श्री. अभिषेक कुमार यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकार्यांनी समितीच्या निवेदनानुसार जिल्ह्यातील सर्व विभागांना राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठीचे आदेश पाठवले आहेत. शहरात याविषयीच्या शासकीय उपक्रमांत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग घेण्याविषयी चर्चा करण्यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांना सर्वांनीच बैठकीसाठी निमंत्रित केले. तसेच ‘शहरातील सर्व शाळांमध्ये समितीच्या वतीने उपक्रम घेण्यात यावेत’, असे पत्र पाठवण्याचा निर्णय दिला.
निवेदन देतांना राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष श्री. मुकुल कापसे, श्री. सुभाष मसदकर, धर्मप्रेमी श्री. अभिषेक दीक्षित, श्री. विकास पानसे, श्री. रोशन मुळे यांसह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.