- प्रभु श्रीरामचंद्रांनी राजधर्माचे पालन करत सीतामातेचा त्याग केला आणि पुढे पतीधर्माचे पालन करत त्यागी जीवन जगले, तसेच सीतामातेवरील त्यांचे प्रेम पुढेही कायम राहिले ! या उलट मुसलमान त्यांच्या पत्नींना तोंडी तलाक देऊन पुन्हा निकाह करण्यास मोकळे होतात !
- तोंडी तलाकचा आणि प्रभु श्रीरामचंद्रांंच्या जीवनातील या घटनेचा येथे काहीही संबंध नसतांना हुसेन दलवाई यांनी जाणीवपूर्वक तो जोडण्याचा प्रयत्न केला आहे ! यातून त्यांची धर्मांधता आणि हिंदुद्वेष दिसून येतो !
- इस्लाममधील ही बुरसटलेली आणि रानटी प्रथा सुधारणावादी आणि पुरोगामी म्हणवणारे दलवाई यांनी पालटण्यास पुढाकार घेणे अपेक्षित होते; मात्र तेही धर्मावरच गेले आहेत. यातून त्यांचा ढोंगी निधर्मीपणा दिसून येतो !
नवी देहली – केवळ मुसलमानच नव्हे, तर हिंदु, ख्रिस्ती, शीख अशा प्रत्येक समाजात महिलांना अवहेलना सहन करावी लागते. प्रत्येक समाजात पुरुषसत्ताक पद्धत आहे. एवढेच काय प्रभु श्रीरामचंद्रांनीही सीतामातेला संशयाच्या आधारे सोडले होते. म्हणून पालट हा सर्वंकष हवा आहे. तो केवळ इस्लामसाठी नको, असे विधान काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार हुसेन दलवाई यांनी केले. १० ऑगस्टला संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. त्यात तोंडी तलाकविषयीचे सुधारित विधेयक राज्यसभेत संमत करण्यात येणार होते. या पार्श्वभूमीवर दलवाई यांनी वरील विधान केले. प्रत्यक्षात हे विधेयक राज्यसभेत ठेवण्यात आलेले नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात