निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या मागण्या
१. मनृस्मृतीचे दहन करणार्या फौजिया खान आणि त्यांचे सहकारी यांच्यावर भारतीय दंड विधान कलम २९५ अ नुसार धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात यावा.
२. यापुढे अशा प्रकारच्या कोणत्याही आंदोलनात कोणत्याही धर्माचा धर्मग्रंथ जाळण्याच्या विरोधात कठोर कायदे बनवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी.
३. विनाकारण प्रशासनावरील ताण वाढवणार्या आणि संवेदनशील वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न करणार्या फौजिया खान यांच्यासह अन्य जणांचीही चौकशी करण्यात यावी.
जळगाव : हेतूपुरस्सर हिंदूंचा धार्मिक ग्रंथ असणार्या पवित्र मनुस्मृतीचे दहन करणार्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान आणि अन्य यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद करण्याच्या संदर्भात येथील जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ११ ऑगस्टला निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकार्यांच्या वतीने तेथील श्री. वांदेकर यांनी निवेदन स्वीकारले. यानंतर पोलीस ठाण्यात जाऊनही गुन्हा नोंद करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली.
त्यापूर्वी महापालिकेसमोर सर्व हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलन करून निषेध केला. आंदोलनाचा आरंभ मनुस्मृती ग्रंथाच्या पूजनाने करण्यात आला. सर्वश्री संग्रामसिंह सूर्यवंशी, आकाश पाटील आणि बंटी बाविस्कर यांनी पूजन केले. या आंदोलनाला पुरोहित संघटनेचे श्री. नंदु शुक्ल, श्री. भूषण मुळ्ये, भागवतकार श्री. देवदत्त मोरदे, साई कथाकार श्री. भूषण जोशी, शिवसेनेचे श्री. मोहन तिवारी, समाजसेवक श्री. संग्रामसिंह सूर्यवंशी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर, त्यासह बजरंग दल, विहिंप, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान आदी विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,
१. ‘संविधान बचाओ, देश बचाओ’ या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अभियानाच्या अंतर्गत बैठक झाल्यावर फौजिया खान, आमदार विद्या चव्हाण, माजी आमदार उषा दराडे, सुरेखा ठाकरे, सोनल वसेकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, तिलोत्तमा पाटील आणि अन्य पदाधिकारी यांनी ७ ऑगस्ट या दिवशी जळगावमधील आकाशवाणी चौकात विनाअनुमती केलेल्या आंदोलनात हिंदूंचा धार्मिक ग्रंथ मनुस्मृतीचे दहन केले.
२. मुळात फौजिया खान यांना हिंदूंच्या धार्मिक ग्रंथाचे दहन करण्याचे कारणच काय ? त्यांनी हा ग्रंथ तरी वाचला आहे का ? मनुस्मृति या धर्मग्रंथाचा काडीमात्र अभ्यास न करता मुसलमान धर्माच्या असणार्या फौजिया खान यांनी हिंदूंच्या धर्मग्रंथाचे दहन करणे, यातून फौजिया खान यांच्यातील हिंदुद्वेषच स्पष्ट होतो. यामुळे प्रक्षुब्ध झालेल्या एखाद्या हिंदूने अन्य धर्मियांच्या धर्मग्रंथाचे असे दहन केले, तर त्याला उत्तरदायी कोण असेल ?
३. जसे फौजिया खान यांना त्यांच्या धर्माच्या ग्रंथांचा आदर आहे, तसाच हिंदूंनाही त्यांच्या धर्मग्रंथांचा आहे, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे होते. एकीकडे महाराष्ट्रात आरक्षणावरून वातावरण संवेदनशील असतांना जाणीवपूर्वक त्याच कालावधीत असे धार्मिक तेढ निर्माण करणारे आंदोलन करणे, यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा फौजिया खान यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येते.
0 Comments