Menu Close

इंग्लंड दौर्‍यावरील भारतीय क्रिकेट संघाच्या जेवणामध्ये गोमांस असणारा पदार्थ

देशात भाजप सत्तेवर असलेल्या बहुतांश राज्यांत गोहत्याबंदी कायदा असून देशातील समाजही गोहत्येवरून संतप्त होत आहे ! असे असतांना बीसीसीआय भारतीय क्रिकेट संघातील बहुसंख्य हिंदू असलेल्या क्रिकेटपटूंना असे पदार्थ देण्याचे धाडस कसे करतो ? भाजपच्या केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी याविषयी क्रिकेट मंडळाला जाब विचारला पाहिजे !

नवी देहली : भारतीय क्रिकेट संघ संध्या इंग्लंडच्या दौर्‍यावर आहे. या संदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने) एक ट्वीट करून भारतीय खेळाडूंच्या जेवणात कोणते पदार्थ आहेत, याची सूची दिली आहे. यात ‘ब्रेज्ड बीफ पास्ता’ (गोमांस असणारा पास्ता) याचाही समावेश आहे. यावरून सामाजिक माध्यमातून बीसीसीआयवर टीका होऊ लागली आहे. (भारतीय क्रिकेट संघात बहुसंख्य हिंदू असलेले क्रिकेटपटू याला विरोध का करत नाहीत ? कि त्यांना बीफसेवन योग्य वाटते ? राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व यांचा गंध नसलेल्या अशा क्रिकेटपटूंना भारतातील हिंदु समाज डोक्यावर घेतो, हे लज्जास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *