Menu Close

राजस्थानमधील हिंदूबहुल गावांची मुसलमानी नावे पालटली

भाजपचे देशातील १९ राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार असतांना केवळ राजस्थानमध्येच अशी नावे का पालटली जात आहेत ? तशी अन्य १८ राज्यांमध्ये नावे पालटण्याचा प्रयत्न का होत नाही ?

जयपूर : राजस्थान सरकारने हिंदूबहुल ३ गावांची पूर्वी असलेली मुसलमान नावे आता पालटली आहेत. अन्य ४ गावांची नावेही लवकरच पालटण्यात येणार आहेत. सरकारने एकूण २७ गावांची नावे पालटण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता; मात्र केवळ ७ गावांची नावे पालटण्याची अनुमती केंद्रातील भाजप सरकारने दिली. (अन्य २० गावांची नावे पालटण्यास केंद्रातील भाजप सरकारने का नकार दिला हेही जनतेला समजायला हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

१. गावांची नावे मुसलमानी असल्याने हिंदु युवकांची लग्ने जुळण्यात अडचणी येत होत्या, अशी तक्रार या गावातील नागरिकांनी केली होती. त्यानंतर पंचायतीकडून गावाचे नाव पालटण्याचा प्रस्ताव राज्याकडे पाठवण्यात आला होता.

२. या गावांची नावे योग्य त्या प्रक्रियेनंतरच पालटण्यात आल्याचे राजस्व विभागाचा स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री अमराराम यांनी स्पष्ट केले.

३. राजस्थानातील या २७ गावांमध्ये हिंदूंची संख्या अधिक आहे, तर केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच मुसलमान कुटुंबे गावात रहातात.

४. बाडमेर जिल्ह्यातील ‘मिंयो का बाडा’ या गावाचे नाव ‘महेशनगर’ असे करण्यात आले आहे. झुंझुंनु जिल्ह्यातील ‘इस्माइलपूर’ गावाचे नाव ‘पिचानवा खुर्द’ असे करण्यात आले आहे. तर अजमेरमधील ‘सलेमाबाद’चे नाव ‘श्रीनिंबार्कतीर्थ’ करण्यात आले आहे.  त्याचप्रमाणे चितोडगडमधील महंमदपुरा, नबाबपुरा, रामपूर, आजमपूर आणि मंडफिया यांची नावे अनुक्रमे मेडी का खेडा, नई सरथल, सीतारामजी खेडा आणि सांवलियाजी असे करण्यात येणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *