Menu Close

गोरक्षक वैभव राऊत यांच्या समर्थनार्थ एकवटले २२ गावांतील ८०० ग्रामस्थ : १७ ऑगस्टला मूकमोर्चा

घरात सुईसुद्धा सापडली नसतांना पोलीस बॉम्ब सापडल्याचे खोटे सांगत आहेत ! – सौ. लक्ष्मी राऊत, वैभव राऊत यांच्या पत्नी

श्री. वैभव राऊत यांच्या पत्नीच्या या खुलाशावरून आतंकवादविरोधी पथकाच्या कारवाईवर जनतेने शंका उपस्थित केल्यास चूक ते काय ?

मुंबई : स्फोटके सापडल्याच्या तथाकथित प्रकरणाच्या आरोपाखाली आतंकवादविरोधी पथकाने अटक केलेले गोरक्षक श्री. वैभव राऊत यांच्या समर्थनासाठी १२ ऑगस्ट या दिवशी वसई तालुक्यातील शेकडो ग्रामस्थ त्यांच्या निवासस्थानी एकवटले. या वेळी २२ गावांतील ८०० हून अधिक ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्री. वैभव राऊत यांना पाठिंबा घोषित केला. श्री. वैभव राऊत यांच्या अन्यायकारक अटकेच्या विरोधात ग्रामस्थांनी १७ ऑगस्ट या दिवशी मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. (कठीण प्रसंगी हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी संघटितपणे आणि ठामपणे उभे रहाणार्‍या नालासोपारा येथील नागरिकांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) श्री. वैभव राऊत यांच्या पत्नी सौ. लक्ष्मी राऊत यांनी त्यांच्या पतीच्या अटकेमागे ‘बीफमाफियां’चेच षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे.

सौ. राऊत म्हणाल्या, ‘‘कथित स्फोटाचा मागोवा घेत कुत्रा घरात आला नाही, तर पोलीसच त्याला खेचतच घेऊन आले. आमच्या घरात बॉम्ब ठेवले असल्याचा जावईशोध आतंकवादविरोधी पथकाने कुठून लावला ? पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात संपूर्ण घराची झाडाझडती घेऊनही सुईसुद्धा सापडली नाही. ८ गावठी बॉम्ब सापडले असल्याचे ते खोटे सांगत असून आमच्या कुटुंबाला अपकीर्त करण्यात येत आहे.

शेजारी असलेल्या साईदर्शन इमारतीमधील दुकानांतून स्फोटके सापडली, असे म्हणतात; मग ती जप्त करतांना श्री. वैभव राऊत यांना समवेत का नेले नाही ? ‘स्फोटके मिळाली’, असे सांगत खोल्या आणि पिशव्या वृत्तवाहिनीवरून दाखवल्या; मात्र त्यात खरोखरच स्फोटके आणि बॉम्ब होते का ?, याची शहानिशा का केली नाही ? त्या रात्री जो प्रकार झाला, त्यामुळे आमचे कुटुंब हादरून गेले आहे. १० ऑगस्ट या दिवशी सकाळी ७ वाजता पोलिसांनी घरातील सामान बाहेर काढले. समवेत प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीसुद्धा होते. वैभव यांचा चेहरा झाकून पोलीस मुंबईत घेऊन गेले.’’

वर्ष २०१५ मध्ये वैभव राऊत यांनी ६०० किलो गोमांस पकडले; म्हणून धर्मांधांचे भांडारआळीवर आक्रमण !

१ फेब्रुवारी २०१५ या दिवशी वैभव राऊत आणि त्यांचे मित्र यांनी भांडारआळीजवळ असलेल्या धनंजय चित्रपटगृहाजवळ एका टेम्पोत ६०० किलो गोमांस पकडले होते. त्यातील कुरेशी नावाच्या टेम्पो चालकाने गाडी रस्त्यावर सोडून पळ काढला होता. त्यामुळे संतापलेल्या बीफमाफियांनी प्राणघातक हत्यारे घेऊन भांडारआळीजवळ चाल केली. त्या वेळी महिलांनी रस्त्यावर उतरून विरोध केल्याने पुढील अनर्थ टळला, नाहीतर मोठी दंगल उसळली असती. या कामगिरीमुळे बीफमाफियांचे पितळ उघडे पडले. त्या वेळी श्री. वैभव राऊत यांच्या समर्थनार्थ ३ फेब्रुवारी २०१५ या दिवशी ‘नालासोपारा बंद’ करण्यात आला होता.

श्री. वैभव राऊत यांच्या घरी पोलिसांनी घातलेल्या छाप्यावर स्थानिकांचे प्रश्‍नचिन्ह !

पोलिसांनी श्री. वैभव राऊत यांच्या घरातून जप्त केलेल्या साहित्याचा पंचनामा केलेला नाही. त्यामुळे आतंकवादविरोधी पथकाच्या अन्वेषणावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. एका वृत्तवाहिनीला स्थानिकांनी पुढील प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या.

‘पोलिसांनी आम्हाला काहीच दाखवले नाही. घरातून काय घेऊन जात आहेत, ते दाखवायला पाहिजे. नेमके बॉम्ब नेले कि कचरा होता ? कापड गुंडाळल्यामुळे आम्हाला काहीच कळले नाही. गावातील प्रतिष्ठित तेथे उपस्थित होते. तरीही पोलिसांनी कुणाला काही दाखवले नाही.’ – स्थानिक महिला, नालासोपारा

‘पोलिसांनी पंचनामा करतांना आम्हाला दाखवले नाही. त्यावर कुणाच्या स्वाक्षरी घेतल्या, तेही आम्हाला ठाऊक नाही.’

– श्री. हर्षद राऊत, स्थानिक

‘वैभवला मी ओळखते. गावातील समस्या सोडवण्यासाठी त्याने नेहमीच पुढाकार घेतला आहे.’ – स्थानिक महिला

‘पोलीस श्री. वैभवच्या घरात अन्वेषण करत असतांना कुणालाच ठाऊक नव्हते. त्यांचे चुलतभाऊ इत्यादी आप्तस्वकियांनाही पोलिसांनी कळू दिले नाही.’ – स्थानिक महिला

‘आम्ही लहानपणापासून त्याला ओळखत आहोत. तो असे करूच शकत नाही.’ – स्थानिक महिला

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *