राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला ! – हिंदु जनजागृती समिती
कर्नाटकातील जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि काँग्रेस यांचे युती सरकार अशा प्रकारे लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाहीच राबवत आहे !
शिवमोग्गा (कर्नाटक) : १२ ऑगस्ट या दिवशी संध्याकाळी ५.३० वाजता शहरातील ओ.टी. मार्गावरील श्री सीतम्मा अनंतय्या सभागृहात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘डाव्यांची हत्या : उजव्यांवरील आरोप ’ या विषयावर ‘जनसंवाद सभे’चे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मोठ्या प्रमाणात प्रसार करण्यात आला होता, तसेच मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले होते; परंतु शेवटच्या क्षणी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी ‘सभा घेऊ नये’, असे सांगितले. या संदर्भात विचारणा केल्यावर याचे स्पष्ट कारण पोलिसांनी दिले नाही. उलट ‘तुम्ही सभा घेतल्यास, भविष्यात तुम्हाला कुठलाही कार्यक्रम करण्यास अनुमती देणार नाही’, अशी धमकीही दिली. (कारण न देता अशा प्रकारे एकतर्फी आदेश देत धमकी देणारे पोलीस कायदाद्रोहीच होत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘सभा शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत राहून आयोजित करण्यात आली होती. तरी अशा प्रकारे सभा रोखणे, हा राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत स्वातंत्र्याचा अवमान आहे. विशेष म्हणजे ही सभा सभागृहामध्ये असल्यामुळे पोलिसांची अनुमती घेण्याची आवश्यकता नाही. पोलिसांनी याला रोखणे म्हणजे राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घातलेला घाला आहे. नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली करण्याचा प्रयत्न आहे. हे निषेधार्ह आहे.’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात