गणेशमूर्ती विसर्जनामुळे एकतरी मासा मृत झाल्याचे दाखवून द्यावे ! – प्रकाश चौगुले, विधाता गणेशोत्सव मंडळ
सांगली : कृष्णा नदीच्या काठावर गेली अनेक वर्षे घरगुती गणेशमूर्तींसह अनेक गणेशमंडळे गणेशमूर्ती विसर्जन करत आहेत; मात्र यामुळे कधी एक मासाही मृत झालेला नाही. तथाकथित पर्यावरणवादी आणि पुरोगामी सांडपाणी, तसेच कारखान्यांमधून निघणार्या सांडपाण्याविषयी मात्र चकार शब्द काढत नाहीत. शासन आणि प्रशासन वेगवेगळे नियम, न्यायालयाचे आदेश दाखवून नेहमीच हिंदूंच्या उत्सवावर बंधने आणण्याचा प्रयत्न करतात, असे परखड मत सांगली येथील विधाता गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते श्री. प्रकाश चौगुले यांनी व्यक्त केले. ते सं
प्रारंभी शंखनादानंतर वेदमूर्ती श्री. दत्तात्रय बापटगुरुजी, हिंदू विधीज्ञ परिषदेचे सदस्य अधिवक्ता संदीप अपसिंगेकर आणि हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. दीपप्रज्वलन होत असतांना वेदमूर्ती अनिल पुजारी यांनी केलेल्या वेदमंत्रपठणामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले. हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिभा तावरे यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. सूत्रसंचालन श्री. प्रशांत चव्हाण यांनी केले. यानंतर अधिवक्ता संदीप अपसिंगेकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिबिरानंतर झालेल्या गटचर्चेत अधिवक्ता संदीप अपसिंगेकर यांनी गणेश मंडळांना येणार्या कायदेशीर, तसेच अन्य अडचणींच्या संदर्भात शंकानिरसन केले.
कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेले मनोगत
१. धुळगाव येथील दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षा सौ. राजश्री सुतार म्हणाल्या, ‘‘आम्ही प्रत्येक उत्सव धार्मिक पद्धतीने साजरे करतो. सकाळच्या आरतीपासून दिवसभरातील प्रत्येक कृती आदर्श पद्धतीने साजरी करण्याचा प्रयत्न केला जातो. चित्रपट गीतांऐवजी भूपाळी, भजन लावतो.’’
२. कौलगे (तासगाव) येथील विजयंता तरुण मंडळाचे श्री. राजू पाटील म्हणाले, ‘‘गेली ४ वर्षे आम्ही उत्सवात केवळ भक्तीपर गाणी लावतो.’’
३. शाडूच्या सात्त्विक गणेशमूर्ती बनवून घेऊन त्या वितरण करणारे मिरज येथील श्री. नितीन कुलकर्णी म्हणाले, ‘‘गेल्या आठ वर्षांपासून शाडूच्या मूर्ती सिद्ध करून त्या वितरित करत आहोत. प्रारंभी केवळ १५ संख्येपासून चालू करून आता सांगली, कोल्हापूर, सातारा, बेळगाव, लातूर येथे ९०० हून अधिक मूर्ती वितरित होत आहेत. मखर, तसेच अन्य सजावटीसाठी व्यय न करता सात्त्विक मूर्तीसाठी आपण व्यय करू शकतो, असे भाविकांचे प्रबोधन केल्यावर त्यांचा शाडूच्या मूर्ती घेण्याकडे कल वाढला.’’
४. पै. भारतभीम कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे कार्यकर्ते कु. सौरभ रमेश तांबडे, श्री. प्रवीण पवार आणि श्री. ऋषिकेश नितीन माळी म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समितीच्या मार्गदर्शनुसार गेली चार वर्षे आम्ही गणेशोत्सव साजरा करत आहोत. मिरवणूक, तसेच अन्य खर्चिक गोष्टींना फाटा देऊन आम्ही भाविकांना प्रसाद वाटप करतो.’’
विशेष
१. सौ. राजश्री सुतार या महिला असून धुळगाव येथे मंडळाचे कार्यक्रम सात्त्विक पद्धतीने साजरे होण्यासाठी पुढाकार घेतात. या शिबिरासाठी १८ किलोमीटर लांबून त्या एकट्या आल्या होत्या आणि शिबिरात तळमळीने सहभागी झाल्या.
२. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केवळ तीन दिवसांपूर्वी केलेल्या संपर्कातून कवठेमहांकाळ येथून ५० किलोमीटर अंतरावरून राजा विद्यानगरचा गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते श्री. संतोष कळंत्री आणि श्री. विजय जाधव आले होते. त्यांनी प्रत्येक सूत्र उत्साहाने आणि अभ्यासपूर्ण मांडले.
३. पै. भारतभीम कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाचा १७ वर्षीय कार्यकर्ता कु. सौरभ रमेश तांबडे हा सगळ्यात लहान असून त्याने हिरिरीने गटचर्चेत भाग घेतला. ‘‘स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर रस्त्यावर टाकलेले राष्ट्रध्वज गोळा करण्यासाठी मी मित्रांसह पुढाकार घेईन,’’ असे कु. सौरभने सांगून उपस्थितांची मने जिंकली.
महापालिका गणेशोत्सव मंडळांसाठी लागणार्या सर्व अनुमती देण्यासाठी ‘एक खिडकी योजना’ चालू करते; मात्र प्रत्यक्षात या अनुमती एकत्रित मिळत नाहीत. सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी मंडळांना अनुमती देण्यासाठी वेगवेगळ्या अडचणी येतात, यावर काय करावे असे विचारले असता अधिवक्ता संदीप अपसिंगेकर म्हणाले, ‘‘एक खिडकी योजने’च्या संदर्भात होणारा त्रास टाळण्यासाठी मंडळांनी एकत्र येऊन आयुक्तांना निवेदन द्यावे, तसेच प्रसंगी पत्रकार परिषद घ्यावी आणि हा विषय प्रसिद्धीमाध्यांकडे लावून धरावा.’’
यंदा गणेशोत्सवात मोहरम येत असून काही ठिकाणी हिंदू दोन्ही उत्सव एकत्रित साजरा करतात. त्या संदर्भात अधिवक्ता संदीप अपसिंगेकर म्हणाले, ‘‘कधी ‘मुस्लीम-हिंदू’ ऐक्य म्हटले जात नाही, तर ‘हिंदू-मुस्लीम ऐक्य’ म्हटले जाते. या ऐक्यातूनच लव्ह जिहादसारख्या समस्या निर्माण होत आहेत. तरी हिंदूंनी या भ्रामक ऐक्याची कल्पना सोडून देणे अपेक्षित आहे.’’