Menu Close

रत्नागिरी जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासंदर्भात शासनाला निवेदन

रत्नागिरी : राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता आहे, याचे स्मरण केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या राष्ट्रीय सणांच्या दिवशीच बहुतांश भारतियांना होते. या दिनी राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात; मात्र हेच  कागदी/प्लास्टिकचे छोटे छोटे राष्ट्र्र्रध्वज त्याच दिवशी सायंकाळपासून रस्त्यांवर, कचर्‍यात  पडलेले आढळतात. या संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी शासन आणि महाविद्यालये यांना देण्यात आले.

राजापूर

येथे ८ ऑगस्ट २०१८ या दिवशी तहसीलदार श्रीमती प्रतिभा वराळे आणि पोलीस हवालदार श्री. साळोखे (राजापूर पोलीस ठाणे) यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. महेश मयेकर, श्री. उल्हास खडपे, श्री. बापूसाहेब पाटील आणि श्री. अविनाश पाटणकर उपस्थित होते.

खेड

येथे १० ऑगस्ट २०१८ या दिवशी तहसीलदार श्री. अमोल कदम आणि खेड पोलीस निरीक्षक श्री. अनिल गंभीर, तसेच तालुक्यातील भरणे येथील ८ महाविद्यालयांना निवेदने देण्यात आली. या वेळी रोहिदास समाज सेवा संघाचे राज्याध्यक्ष श्री. सुरेश खेडेकर, राष्ट्राभिमानी श्री. दत्ताराम जाधव, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. रमेश भागवत, धर्माभिमानी श्री. दिनेश पोफळकर, सनातन संस्थेचे श्री. अशोक कदम आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. विलास भुवड उपस्थित होते.

देवरुख

येथे १० ऑगस्ट २०१८ या दिवशी तहसीलदार श्री. संदीप कदम आणि पोलीस हवालदार श्री. एन्.जी. नलावडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे श्री. विनायक फाटक, श्री. हनुमंत मोरे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. अण्णासाहेब दिवटे उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *