Menu Close

बांगलादेशमध्ये हिंदूंवरील वाढत्या आक्रमणामुळे इस्लामचा अधिकृत धर्माचा दर्जा काढणार

नवी देहली : बांगलादेशमध्ये इस्लाम धर्माला मिळालेला अधिकृत धर्माचा दर्जा काढण्यात येण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काळात बांगलादेशमध्ये कट्टरपंथीयांकडून ख्रिश्नच, हिंदू आणि मुसलमान अल्पसंख्यांकावर हल्ले झाले आहेत.

बांगलादेशमध्ये मुसलमान धर्माला असलेला अधिकृत धर्माचा दर्जा काढण्यासंबंधी बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयात खटला चालू असल्याचे वृत्त डेली मेलने दिले आहे. १९८८ पासून बांगलादेशमध्ये मुसलमान धर्माला अधिकृत धर्माचा दर्जा आहे. पण हा दर्जा काढून टाकण्याला अनेक अल्पसंख्यांक समाजाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे.

इस्लामला अधिकृत धर्माचा दर्जा देणे हे बेकायदेशीर असल्याचे इथल्या अल्पसंख्यांक ख्रिश्नच, हिंदू आणि मुसलमान अल्पसंख्यांक नेत्यांचे म्हणणे आहे. बांगलादेशमध्ये ९० टक्के लोकसंख्या मुसलमान आहेत तर ८ टक्के हिंदू आणि २ टक्के अन्य अल्पसंख्याक इथे रहातात.

मागच्या महिन्यात बांगलादेशच्या पंचागड जिल्ह्यातील हिंदू मंदिरावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मंदिराच्या पूजा-याची हत्या करण्यात आली होती आणि दोन हिंदू भाविक जखमी झाले होते. मागच्यावर्षी अनेक नामांकीत अल्पसंख्यांक लेखकांची हत्या करण्यात आली होती.

संदर्भ : लोकमत

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *