भारतातही कार्यरत असणार्या विदेशी आणि देशातील संस्थांकडून असे प्रकार घडत आहेत का, याचा शोध भारत सरकारने घेतला पाहिजे !
न्यूयॉर्क (अमेरिका) : विकसनशील आणि गरीब राष्ट्रांतील लहान मुलांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ‘युनिसेफ’ या संस्थेचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. अनेक श्रीमंत देश आणि मोठे उद्योग यांच्याकडून मिळवलेल्या निधीचा वापर ‘युनिसेफ’च्या वतीने लहान मुलांच्या विकासासाठी केला जातो; मात्र या संस्थेत कार्यरत असलेले अनेक पाश्चिमात्य देशांतील कार्यकर्ते आणि पगारी नोकर यांच्या विरुद्ध गरीब देशांतील लहान मुलांचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचे आरोप कित्येक वर्षांपासून होत आहेत; मात्र संस्थेचे नाव अपकीर्त होऊ नये; म्हणून या शोषणाच्या बातम्या दडपून ठेवून अद्यापही या घृणास्पद प्रकाराला आळा घालण्याचे प्रयत्न होतांना दिसत नाहीत. त्याविरुद्ध संयुक्त राष्ट्रांचे (युनोचे) एक माजी वरिष्ठ अधिकारी अँड्र्यू मॅकलिओड यांनी मोहीम उघडली आहे. त्यांनी ‘युनिसेफ’मध्ये चालणार्या लैंगिक शोषणाला कॅथोलिक चर्चमध्ये चालू असलेल्या अशाच प्रकारच्या नीच कृत्याची उपमा देऊन त्याविरुद्ध ‘ए लाइफ हाफ लीव्हड’ (अर्धे जगलेले आयुष्य) या पुस्तकाद्वारे आणि ‘हिअर देअर क्राईज’ (त्यांचा आक्रोश ऐका) या संघटनेद्वारे वाचा फोडली आहे.
१. ‘युनिसेफ’मध्ये काम करणार्या डीडीअर बोर्गेत या एक फ्रेंच नागरिक असलेल्या नोकरदाराने ‘मी किती लहान मुलांवर बलात्कार केले असतील, हे मलाही आठवत नाही’ या शीर्षकाखाली वृत्तपत्रात लेख लिहिल्याने खळबळ माजली आहे. हाच धागा पकडून अँड्र्यू मॅकलिओड यांनी लेख लिहून त्यात गेल्या १० वर्षांत ६० सहस्र मुलांचे लैंगिक शोषण झाल्याचे त्यांच्या संस्थेला कळल्याचे म्हटले आहे; मात्र हा आकडा हिमनगाचे एक टोक असल्याचेही म्हटले आहे.
२. स्वत: ऑस्ट्रेलियाचे नागरिक असलेल्या मॅकलिओड यांनी पंतप्रधान ज्युलिया गॅलार्ड यांनाही या प्रकाराविषयी सांगितले. इंग्लंडच्या संसदेने नेमलेल्या चौकशी समिती समितीने सादर केलेल्या अहवालातही असे प्रकार चालतात याला दुजोरा दिला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments