Menu Close

वर्धा येथे सार्वजनिक उत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांसाठी सार्वजनिक उत्सव समन्वय शिबीर

देशाला पुन्हा एकदा सुराज्याकडे नेणे आवश्यक आहे ! – श्रीकांत पिसोळकर, विदर्भ समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

दीपप्रज्वलन करतांना श्री. श्रीकांत पिसोळकर, सौ. भार्गवी क्षीरसागर आणि सौ. भक्ती चौधरी

वर्धा : हिंदूसंघटन आणि राष्ट्रजागृती यांसाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला. त्याद्वारे देश स्वतंत्र झाला असला, तरी आजही तो पाश्‍चात्त्य विकृती, भ्रष्टाचार, हिंदूंच्या धार्मिक गोष्टींचे होणारे हनन आणि अल्पसंख्यांकांचे वाढते लांगूलचालन यांमुळे अद्यापही पारतंत्र्यातच आहे. स्वधर्माविषयी अज्ञान, धर्मशिक्षण आणि संघटन यांचा अभाव यांमुळे हिंदूंची अतोनात हानी झाली आहे. आज बहुसंख्य हिंदूंचीच त्यांच्या देशात किंमत शून्य झाली आहे. त्यामुळे राष्ट्रपयोगी कार्य करणार्‍या मंडळांना एकत्र करून देशाला पुन्हा एकदा सुराज्याकडेे नेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्धा येथे सार्वजनिक उत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांसाठी ‘सार्वजनिक उत्सव समन्वय शिबीर’ आयोजित करण्यात आले. या वेळी ‘सार्वजनिक उत्सव मंडळाचे हिंदु राष्ट्र-स्थापनेतील योगदान’ या विषयावर ते बोलत होते.

शिबिराचा उद्देश सांगतांना वर्धा येथील हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयक सौ. भक्ती चौधरी म्हणाल्या, ‘‘वर्ष १८९४ पासून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला. त्यामुळे धर्मापासून दूर गेलेले हिंदू मोठ्या प्रमाणात एकत्र आले आणि हिंदूंमध्ये जागृती होऊन देश स्वतंत्र होण्यास साहाय्य झाले. स्वातंत्र्योत्तर काळात निधर्मीवादामुळे हिंदु धर्माची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली आहे. हे रोेखण्यासाठी आणि हिंदूंवर होणारे आघात दूर करण्यासाठी सार्वजनिक उत्सवांमधून हिंदूंचे संघटन करणे आवश्यक आहे.

‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’ या विषयावर सनातन संस्थेच्या साधिका सौ. भार्गवी क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी गटचर्चा घेण्यात आली. दीपप्रज्वलन आणि शंखनाद करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सूत्रसंचालन श्री. हितेश निखार यांनी केले. तसेच उपस्थितांना ‘गणेशोत्सव वास्तव आणि आदर्श’ ही ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली.

क्षणचित्र

अभ्यंकर सभागृहाचे मालक श्री. मंदार अभ्यंकर यांनी सर्व वस्तूंसहित वातानुकूलित सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले, तसेच उपस्थितांना चहा-बिस्किटे दिली.

गटचर्चेत मंडळाच्या पदाधिकार्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

गटचर्चेमध्ये मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या गटचर्चेत मंदिर आणि सार्वजनिक उत्सव यांमध्ये रज-तमात्मक कार्यक्रमापेक्षा राष्ट्र आणि धर्म यांवर आयोजित कार्यक्रम घेण्याचा मंडळ पदाधिकार्‍यांनी निर्धार केला. त्यांनी त्यांच्या मंदिर आणि उत्सवांमध्ये प्रबोधन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला आमंत्रित केले. जी गणेश मंडळे या वेळी उपस्थित नव्हती, त्यांचीही भेट घेऊन आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा, यासाठी संघटितपणे मंडळांना भेटी देण्याचे नियोजन करणार आहेत.

उत्स्फूर्त सहभाग

केळकरवाडी येथील नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. विनेाद बांगलकर, बोरगांव येथील शिवमंदिर उत्सव समितीचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर यादव, सावता माळी मंदिर उत्सव समितीचे अध्यक्ष श्री. मनोहरराव वाळके आणि सुदामपुरी येथील नवरात्रोत्सवचे अध्यक्ष श्री. उदाराम करनाके या सर्वांचाच उत्स्फूर्त सहभाग होता.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *