Menu Close

अभिनेत्री हिना खान हिच्याकडून श्री गणेशाचा अवमान

हिंदूंनी अशा अवमानाच्या विरोधात वैध मार्गाने विरोध केला पाहिजे ! तसेच तक्रारही नोंदवली पाहिजे ! अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांविषयी असा अवमान कोणी कधी करतो का ?

नाशिक : दूरचित्रवाहिनीवरील अभिनेत्री हिना खान हिने नाशिक येथे एका रिसॉर्टमध्ये सुट्टी साजरी करतांना तेथील काही छायाचित्रे सामाजिक माध्यमामध्ये पोस्ट केली आहेत. या छायाचित्रातून तिने श्री गणेशाचा अवमान केल्याचे समोर आले आहे.

हिना खान हिने तिचा मित्र रॉकी जयस्वाल याच्यासमवेत या रिसॉर्टमध्ये काही छायाचित्रे काढली आहेत. त्यात कमरेखाली अत्यंत तोकडे कपडे घातल्याचे दिसत आहेत. तसेच तिने श्री गणेशाच्या मूर्ती शेजारी विविध पद्धतीने उभे राहून छायाचित्रे काढली आहेत. या वेळी तिने बूट घातले आहेत. यामुळेे तिला सामाजिक माध्यमातून विरोध केला जात आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *