बकरी ईदच्या दिवशी गोहत्या करणार्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी ! – मुकुल कापसे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्र्रीय बजरंग दल
अमरावती : एकीकडे सरकार ‘इको फ्रेंडली’ गणेशोत्सव साजरा करण्याचे हिंदूंना आव्हान करते आणि दुसरीकडे मात्र बकरी ईदला गोहत्या केली जाते. याचे गांभीर्य लक्षात घेता आणि गोहत्येची वाढती संख्या बघता शासनाने गोहत्या करणार्यांवर कठोर कारवाई करावी, असे मत राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष श्री. मुकुल कापसे यांनी हिंदु जनजागृती समिती आयोजित राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वेळी व्यक्त केले.
अमरावती येथील जयस्तंभ चौक या ठिकाणी सायंकाळी ४ ते ५.३० या वेळेत राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विश्व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश चिकटे, सनातन संस्थेच्या सौ. विभा चौधरी, हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी आंदोलनाच्या विषयांवर त्यांची मते व्यक्त केली. फेसबूक लाईव्ह च्या माध्यमातून २५ सहस्र धर्मप्रेमींनी आंदोलनाचा लाभ घेतला. या वेळी आंदोलनात पुढील मागण्या करण्यात आल्या
१. ‘बकरी ईद’च्या दिवशी होणारी गोहत्या रोखण्यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे. ठिकठिकाणी टेहाळणीसाठी पोलीस पथके सिद्ध ठेवावीत. शासनाच्या आदेशानुसार शासकीय पशूवधगृहांच्या व्यतिरिक्त अन्यत्र कुठेही प्राण्यांची कत्तल करता येत नाही. त्यामुळे ‘बकरी ईद’च्या निमित्ताने तात्पुरती पशूवधगृहे उभारण्यास अनुमती देऊ नये.
२. ‘इको फ्रेंडली’ मूर्तीच्या नावाखाली ‘राष्ट्रीय हरित लवादा’ने प्रदूषणकारी असल्याचे घोषित केलेल्या कागदी लगद्यापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तींना शासनाने प्रोत्साहन देऊ नये.
३. १० ऑक्टोबर या दिवशी ‘नवरात्री’ आरंभ होत असून ५ ऑक्टोबर या दिवशी सलमान खान निर्मित ‘लवरात्री’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे ‘लवरात्री’ हे नाव हेतूतः हिंदूंच्या ‘नवरात्री’ या उत्सवावरून ठेवले आहे; जेणेकरून हिंदू त्याला विरोध करतील आणि वाद निर्माण करून चित्रपटाचा धंदा अधिक चालेल. ‘लवरात्री’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही ‘तिला पटवण्यासाठी तुझ्याकडे ९ दिवस आणि ९ रात्रीच आहेत’, असे संवाद असल्याने ‘हिंदूंचे धार्मिक उत्सव हे प्रेमप्रकरणे करण्यासाठीच असतात’, असा चुकीचा संदेश यातून जात आहे. हे अत्यंत निषेधार्ह आहे. चित्रपटाचे नाव बदलावे.
४. आसाममधील बांगलादेशी, पाकिस्तानी आणि रोहिंग्या मुसलमान घुसखोरांनाही तात्काळ देशाबाहेर काढावे.