Menu Close

पेनसिल्व्हेनिया (अमेरिका) : चर्चमधील पाद्य्रांकडून लहान मुलांवर केले गेलेले अमानवीय अत्याचार

(म्हणे) लैंगिक संबंध ठेवल्यास स्वर्गात जाल : पाद्य्रांचे मुलांना आमीष

पेनसिल्व्हेनिया (अमेरिका) : पेनसिल्व्हेनिया राज्यातील ६ केंद्रांतील कॅथलिक चर्चमध्ये ३०० पाद्य्रांनी गेल्या ७० वर्षांत सुमारे १ सहस्र लहान मुलांचे लैंगिक शोषण केले. याविषयीचा उच्चस्तरीय समितीचा ८८४ पानांचा अहवाल नुकताच उघडकीस आला. या अहवालातील काही गंभीर सूत्रे आता समोर आली आहेत. या अहवालात ‘पाद्य्रांनी लैंगिक अत्याचार करण्यासाठी धर्माचा शस्त्रासारखा वापर केला’, असे म्हटले आहे.

१. पाद्य्रांनी लहान मुलांना विविध आमिषे दाखवून, तर कधी भीती दाखवून त्यांच्यावर अमानवी लैंगिक अत्याचार कसे केले, याचे सविस्तर वर्णन या अहवालात करण्यात आले आहे. उदाहरणार्थ एका पाद्य्राने एका ७ वर्षे वयाच्या मुलास ‘माझ्याशी लैंगिक संबंध ठेवल्यास तू स्वर्गात जाशील’, असे सांगून ३ वर्षे अत्याचार केले. दुसर्‍या एका प्रकरणात मुलांनी लैंगिक संबंध ठेवण्यास सहकार्य केले नाही, तर ते नरकात जातील, असे त्यांना सांगितले.

२. एका पाद्य्राने एका मुलाला ओणवे बसवून दोराने बांधले आणि ७ इंच क्रॉसने त्याच्या गुप्तांगाला इजा केली, तर दुसर्‍या पाद्य्राने क्रॉसचा वापर त्याला नकार देणार्‍या मुलाला मारण्यासाठी केला.

३. एका पाद्य्राने एका मुलाला सांगितले की, ‘तो (पाद्री) ईश्‍वराचाच एक अंश आहे; म्हणून त्याला कोणतेही कृत्य करता येते’. काही ठिकाणी पाद्य्रांनी पापाची स्वीकृती (कन्फेशन) देण्याचा धार्मिक विधी पार पाडतांनाही मुलांशी घाणेरडे कृत्य केले.

४. पेनसिल्व्हेनिया राज्यातील ६ केंद्रांतील कॅथलिक चर्चचे सुमारे १७ लक्ष सदस्य आहेत. चर्चच्या धार्मिक नेत्यांनी झालेल्या प्रकाराविषयी खेद व्यक्त करून त्यात सहभागी असलेल्या ३०१ पाद्य्रांची सूची सादर केली. त्यांतील १०० पाद्री सध्या जिवंत नाहीत.

५. एका पाद्य्राने चर्चच्या प्रार्थनेत भाग घेणार्‍या मुलांना नग्न रहाण्यास सांगितले. ‘मानवनिर्मित कपडे घालून प्रार्थना करणे ईश्‍वराला आवडणार नाही’, असे तो म्हणाला.

६. अनेक पाद्य्रांना जेव्हा मुलांना एकांतात भेटण्याची संधी मिळायची, तेव्हा ते त्यांचे लैंगिक शोषण करायचे.

७. ख्रिस्त्यांच्या वतीने चालवण्यात येणार्‍या शाळांतील विद्यार्थ्यांना पाद्री त्यांचे परीक्षेतील गुण वाढवून देण्याचे अमीष दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

 

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *