जळगाव : धानोरा येथे ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर प्रवचन घेतले. शिवम ग्रुपचे श्री. मनोज पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याचा गावातील २०० महिलांनी लाभ घेतला. ‘महिला आणि युवती यांनी राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श ठेवून स्वाभिमानी जीवन जगावे’, असे मार्गदर्शन सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी या वेळी केले.
क्षणचित्रे
१. प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचा परिचय करून देणारा आणि लव्ह जिहादविषयीचा, ‘आयबीएन् ७’ या वृत्तवाहिनीने प्रसारित झालेला व्हिडिओ दाखवण्यात आला.
२. मंदिरात क्रांतीकारकांची माहिती देणारे फलक प्रदर्शन आणि सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादनांचा कक्ष लावण्यात आला होता.
३. धानोरा गावच्या सरपंच सौ. कीर्ती पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. शिक्षिका सौ. रेखाताई यांनी त्यांच्या गावात असे व्याख्यान आयोजित करण्याची मागणी केली.