Menu Close

अंनिसचा केविलवाणा उपक्रम : ‘जवाब दो’

प्रतिनिधी (पुणे)

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अंनिसने ‘जवाब दो’ या त्यांच्या केविलवाण्या उपक्रमाला यंदाही २० ऑगस्टला एकदिवसीय चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. या दिवशी ‘आम्ही सारे दाभोलकर’ असे म्हणत मोर्चे निघतील ! ‘गोळी मारून विचार संपत नाही’, ‘हत्येचे सूत्रधार’ वगैरे नेहमीची भाषणबाजी केली जाईल. ज्यांच्यावर अंनिस बेछूट आरोप करत आहे, त्यांनी अंनिसच्या हिंदुद्रोही प्रश्‍नांची उत्तरे अनेकदा दिली आहेत. ‘You can fool all the people some of the time and some of the people all the time; but you cannot fool all the people all the time’ असे एक वचन आहे. त्यामुळे अंनिसने प्रतिवर्षी ‘जवाब दो’चा कितीही कांगावा केला, तरी जनतेला आता सत्य उमजू लागले आहे. त्यामुळे आता अंनिसलाच ‘जवाब दो’ असे खडसावण्याची आवश्यकता आहे !

अंनिस, ‘जवाब दो’ !

  • अंधश्रद्धेच्या नावाखाली समाजातून आस्तिकता आणि श्रद्धा यांचे उच्चाटन करण्याच्या प्रयत्नांविषयी
  • वैज्ञानिक जाणिवांच्या नावाखाली शालेय विद्यार्थ्यांमध्ये नास्तिकता पेरण्याविषयी
  • ‘फलज्योतिष’ या शाखेवर अज्ञानमूलक टीका करण्याविषयी
  • साधूसंतांवर अश्‍लाघ्य टीका करण्याविषयी
  • गणेशोत्सवामध्ये पर्यावरणपूरकतेच्या ‘लेबल’खाली धर्मशास्त्रविरोधी संकल्पनांचा प्रसार करण्याविषयी
  • पाण्याचे प्रदूषण करणार्‍या कागदी गणेशमूर्तींच्या (अ)वैज्ञानिक (!) प्रसाराविषयी
  • अंनिसच्या न्यासामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आणि अफरातफर असल्याविषयी
  • अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली समाजातून पैसे घेऊन त्याचा वैयक्तिक कारणांसाठी उपयोग केल्याप्रकरणी
  • खोटी कागदपत्रे सिद्ध करून शासन-प्रशासन यांची फसवणूक केल्याप्रकरणी
  • कायद्याचे उल्लंघन करून विदेशी देणग्या स्वीकारल्याप्रकरणी आणि विदेशी देणग्या मिळत असल्याचे लपवून साधेपणाचा आव आणल्याविषयी
  • डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटनेवर धादांत खोटे दोषारोप करून हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा छळ केल्याप्रकरणी
  • पूर्वग्रहदूषित आरोप करून डॉ. दाभोलकर हत्येचे अन्वेषण भरकटवल्याप्रकरणी
  • सनातनचे साधक डॉ. तावडे यांचा खटला चालू न देण्याविषयी
  • ‘दोषींना पकडा’ या निष्पक्ष मागणीऐवजी ‘हिंदुत्वनिष्ठ संस्थेच्या साधकांना पकडा’ अशी पूर्वग्रहदूषित मागणी करण्याविषयी

ही सूची अजून पुष्कळ मोठी आहे. या प्रश्‍नांची उत्तरे देण्याचा ‘विवेक’ अंनिस कधीच दाखवणार नाही; कारण ‘विवेकाचा आवाज’ असे नारे देणार्‍यांमध्ये विवेकाचा अंशही शिल्लक नाही, ही वस्तूस्थिती आहे !

सत्यमेव जयते ।

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *