Menu Close

जळगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन संपन्न

नालासोपारा प्रकरणी कायदाबाह्य वर्तन करणार्‍या पोलिसांवर कारवाई करा ! : जळगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी

जळगाव : मुंबई आतंकवादविरोधी पथकाने (एटीएस्ने) नालासोपारा (जिल्हा पालघर) येथील गोरक्षक श्री. वैभव राऊत, श्री. शरद कळस्कर आणि श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. सुधन्वा गोंधळेकर यांना स्फोटके बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. ही कारवाई करतांना आतंकवादविरोधी पथकाच्या पोलिसांनी कायदाबाह्य वर्तन केले. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी हिंदुत्वनिष्ठांनी जळगाव महापलिकेसमोर १८ ऑगस्ट या दिवशी झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात केली. आंदोलनानंतर हिंदुत्वनिष्ठांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात गृहशाखेचे श्री. वांधेकर यांनी स्वीकारले.

‘आसाममध्ये बांगलादेशी घुसखोर कोण आणि मूळ आसामी नागरिक कोण, याची माहिती देणारी ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन’ची प्राथमिक सूची प्रसिद्ध झाल्यावर काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी गोंधळ घालायला आरंभ केला. घुसखोर मुसलमान आता राष्ट्रीय समस्या बनली आहे. त्यामुळे केवळ आसाममधील बांगलादेशी घुसखोरच नव्हे, तर संपूर्ण देशभरातील बांगलादेशी, पाकिस्तानी आणि रोहिंग्या मुसलमान घुसखोरांनाही तात्काळ देशाबाहेर काढा’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी केली. जय माता दी ग्रुपचे श्री. राज नागदेव यांनीही अवैध घुसखोरीच्या समस्येकडे राजकारण न करता गांभिर्याने पहाण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

‘शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान येथील मंदिरासाठी वापरण्यात येणार्‍या नमुना तुपात झुरळे सापडल्याचा गंभीर प्रकार निदर्शनास आला आहे. प्रसादासाठी वापरण्यात येणार्‍या तुपामध्ये झुरळ सापडणे, हे देवपूजेचे पावित्र्य नष्ट करणे आणि भक्तांच्या आरोग्याशी खेळण्यासारखेच आहे. त्यामुळे तरी या प्रकरणाशी संबंधित विश्‍वस्त, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी या वेळी केली.

आंदोलनातील अन्य मागण्या

१. १० ऑक्टोबरला ‘नवरात्री’ आरंभ होत असून ५ ऑक्टोबर या दिवशी सलमान खाननिर्मित ‘लवरात्री’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे ‘लवरात्री’ हे नाव हेतूतः हिंदूंच्या ‘नवरात्री’ या उत्सवावरून ठेवले आहे. हे अत्यंत निषेधार्ह आहे. तरी  चित्रपटाचे नाव बदलावे, यासंदर्भात सेन्सॉर बोर्ड आणि शासन यांना निवेदन देण्यात आले आहे.

२. उत्तरप्रदेशमधील देवरिया येथील सरकारी शाळेचे नाव पालटून ‘इस्लामिया प्रायमरी स्कूल’ केले गेले, तसेच अन्य चार सरकारी शाळांना शुक्रवारी सुटी घोषित करण्यात आली, हा भारताचे पद्धतशीरपणे ‘इस्लामीकरण’ करण्याच्या षड्यंत्राचा भाग आहे. त्यामुळे शासनाने देशभरातील सर्व शाळांची या दृष्टीने चौकशी करावी आणि भारताचे इस्लामीकरण रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत.

३. २२ ऑगस्टला ‘बकरी ईद’ आहे. या दिवशी भारतात मुसलमानबहुल वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बकर्‍यांसमवेत गोमातांचीही कत्तल केली जाते, असा पूर्वानुभव आहे. त्यामुळे गोवंश हत्या रोखण्यात यावी.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *