अमरावती : जिल्ह्यात १५ ऑगस्ट यादिवशी पंटवटी चौक, अमरावती आणि दर्यापूर तालुका येथे राष्ट्रध्वज सन्मान मोहीम आणि क्रांतीकारकांची माहिती देणारे फलक प्रदर्शन लावण्यात आले.
मोहिमेच्या अंतर्गत जमा करण्यात आलेले राष्ट्रध्वज शहरात जिल्हाधिकारी, तर तालुक्यात तहसीलदार यांच्याकडे जमा करणार आले.
दर्यापूर
दर्यापूर येथील मोहिमेत १० धर्मप्रेमींनी पुढाकार घेतला. येथे ‘डिजिटल स्क्रीन’वर ४ दिवस प्रबोधनपर चित्रफीत दाखवण्यात आली. याचा परिणाम म्हणून या भागातील ध्वजाची विक्री थांबली. चित्रफीत दाखवण्यासाठी लागणारी ध्वनीक्षेपक यंत्रणा धर्मप्रेमींनी स्वत:हून उपलब्ध करून दिली. धर्मप्रेमींनी १६ ऑगस्ट या दिवशीही रस्त्यावर पडलेले प्लास्टिकचे गोळा केले आणि तहसीलदारांकडे जमा केले.
अमरावती
अमरावती शहरात ८ धर्मप्रेमी उत्स्फूर्तपणे मोहिमेत सहभागी झाले होते. येथे एका शाळेत व्याख्यान ऐकून मुख्याध्यापकांनी शाळेत संस्कारवर्ग चालू करण्याची मागणी केली.