Menu Close

भ्रष्टाचारी काँग्रेसी राधाकृष्ण विखे पाटील यांनाच प्रथम अटक करा : सनातन संस्था

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अटक करण्याची विखे पाटील यांची मागणी

मुंबई : परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अटक करण्याची मागणी करणार्‍या भ्रष्टाचारी काँग्रेसी राधाकृष्ण विखे पाटील यांनाच प्रथम अटक करा, अशी मागणी सनातन संस्थेने केली आहे. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,

१. ‘कालपासून काँग्रेसच्या उतावीळ नेत्यांकडून सातत्याने ‘सनातनवर बंदी घाला’ आणि ‘सनातनच्या प्रमुखांना अटक करा !’ अशी मागणी केली जात आहे. काँग्रेसच्या नेत्यांची मागणी ही स्वतःची कातडी बचाव करण्यासाठी सनातनला लक्ष्य करण्यासारखी आहे.

२. सनातन संस्थेने वर्ष २०१५ आणि मार्च २०१८ मध्ये विखे-पाटील यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड केली. दुर्दैवाने भाजप सरकारनेही अद्याप यावर काहीही कारवाई केली नाही. याचाच सूड घेण्याच्या भावनेतून विखे-पाटील यांची ही धडपड चालू आहे. सनातनच्या प्रमुखांना अटक करा, अशी मागणी करण्याचा नैतिक अधिकार काँग्रेसींना उरलेला नाही.

३. ज्या पक्षातील सरचिटणीस आतंकवादी डॉ. झाकीर नाईक यांचे आलिंगन देऊन त्यांच्या व्यासपिठावर जातात, डॉ. झाकीर यांच्याकडून ५० लाख रुपयांचे साहाय्य काँग्रेसला केले जाते, पंजाबमधील काँग्रेसी मंत्री नवज्योतसिंह सिद्धू भारतावर आक्रमण करणार्‍या पाकिस्तानी सैन्यदलप्रमुखांना आलिंगन देतात, पाकिस्तानात जाऊन भारतातील सरकार पालटण्याची लाचार आणि देशद्रोही मागणी करणार्‍या मणिशंकर अय्यर यांची जी काँग्रेस ‘घरवापसी’ करून घेते, नुकतेच मणीपूर काँग्रेस आमदाराच्या घरी पोलीस मुख्यालयातून चोरीला गेलेली शस्त्रास्त्रे सापडली, बोफोर्सपासून आदर्श-खाण घोटाळ्यापर्यंत ज्या काँग्रेसचे मंत्री भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहेत (ही सूची न संपणारी आहे), अशा काँग्रेसी पापांसाठी काँग्रेसी प्रमुख राहुल गांधी किंवा तत्कालीन प्रमुख सोनिया गांधी यांना कह्यात घेऊन त्यांना अटक करावी, अशी जर कोणी मागणी केली, तर ती जेवढी हास्यास्पद ठरेल, तेवढीच हास्यास्पद आणि बालीश मागणी महाराष्ट्रातील काँग्रेसी ‘विनोदी’पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील करत आहेत.

४. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे अन्वेषण चालू होण्याआधीच ज्या पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘या हत्येमागे उजव्या विचारसरणीचा हात आहे’, अशी आवई उठवून अन्वेषण भरकटवले. त्यांचेच भाऊबंद असलेले विखे-पाटील हेही स्वतःची पापे झाकण्यासाठी सनातनवर बंदीसाठी थयथयाट करत आहेत. त्यासाठी ‘खोटे बोल पण रेटून बोल’ या काँग्रेसी तत्त्वानुसार सनातनवर खोटे आरोप करत आहेत. त्यामुळे सनातनवर बंदी येईल कि नाही, हे काळ ठरवेल; पण विखे-पाटील यांना तुरुंगाची हवा खाण्यासाठी सनातनचा सिंहाचा वाटा नक्की असेल, हे त्यांनी लक्षात ठेवावे, अशी चेतावणी या पत्रकातून देण्यात आली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *