सनातनवरील बंदीचे प्रकरण
वर्धा : डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी तपास अपूर्ण आहे, त्या संदर्भातील पुरावे मिळत नाहीत, न्यायालयीन प्रक्रिया चालू झालेली नाही, कोणत्याही प्रकारचा गुन्हा सिद्ध झाला नाही; मात्र त्यापूर्वीच ‘सनातनवर बंदी हवी !’, अशी मागणी करण्यात येत आहे आणि हिंदुत्वनिष्ठांचा छळ केला जात आहे. याचा जवाब कोण देणार ?, अशा आशयाचे निवेदन वर्धा येथील जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने देण्यात आले.
या वेळी सनातन संस्थेच्या सौ. भार्गवी क्षिरसागर, श्री. शशिकांत पाध्ये, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवा थोटे, सौ. भक्ती चौधरी, विश्व हिंदु परीषदेचे जिल्हा अध्यक्ष श्री. संजय बडगेलवार, श्री. संजय कावळे, गोरक्षा समितीचे श्री. पवन गोहत्रे, श्री राम मंदिर समितीचे श्री. संजय हरदास आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ या वेळी उपस्थित होते. या निवेदनाच्या माध्यमातून शासनाकडून ‘अंनिसला जाब विचारावा’ अशी मागणी करण्यात आली. असेच निवेदन नांदेड येथेही देण्यात आले.