आतंकवाद्यांच्या विरोधात इतके कठोर होण्याचा विचार गेली ३० वर्षे आतंकवाद्यांची आक्रमणे भोगणार्या भारतियांनी तरी केला होता का ?
वॉशिंग्टन : इसिस करत असलेल्या सार्वजनिक शिरच्छेद वा बंद पिंजर्यामध्ये पाण्यात बुडवून मारणे यांसारख्या दुष्कृत्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेस स्वतःच्या धोरणाचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे. जिहादी आतंकवाद्यांच्या बायकांना आणि मुलांनाही ठार करण्यात आले पाहिजे, असे प्रतिपादन अमेरिकेतील राष्ट्रपती पदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.
ट्रम्प म्हणाले की,
१. इसिसला जशास तसे उत्तर देण्याची आवश्यकता आहे. यामुळे आता अस्तित्वात असलेले कायदे आणखी कडक करावे लागतील.
२. तुमच्या शत्रूवर कोणतेही बंधन नसतांना; आणि तुमच्यावर कायद्यांचे मोठे बंधन असतांना यश मिळवणे अत्यंत अवघड आहे.
३. मी अमेरिकेचा राष्ट्र्राध्यक्ष झालो; तर जिहादी आतंकवाद्यांच्या चौकशीकरता अन्वेषण संस्थांकडून वापरण्यात येणार्या वॉटरबोर्डिंग (चेहरा कपड्याने झाकून त्यावर पाणी ओतणे) आणि अशा अन्य स्वरूपाच्या पद्धतींवर कायद्यान्वये घालण्यात आलेली बंदी उठवण्याचा प्रयत्न केला जाईल. या बंदीमुळे इसिसविरुद्ध सध्या चालू असलेल्या युद्धामध्ये अमेरिकेस तोटा होत आहे.
४. ट्रम्प यांच्या या प्रस्तावामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन होण्याची भीती आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात