मुंबई : क्रांतीकारकांना अपेक्षित असलेला अखंड भारत निर्माण करण्यासाठी संताचे मार्गदर्शन घेऊन राष्ट्र-धर्माचे कार्य साधना म्हणून करायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश सोनार यांनी येथे आयोजित कार्यक्रमात केले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पवईच्या तमिळ हॉल येथे विश्व हिंदु परिषदेच्या वतीने श्री. कृष्णा राव आणि श्री. शैलेश तिवारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. या वेळी ३५ राष्ट्रप्रेमी उपस्थित होते.
श्री. सतीश सोनार पुढे म्हणाले, ‘‘देशाला स्वातंत्र्य मिळाले नसून सहस्रो क्रांतीविरांनी त्यांच्या प्राणाचे बलीदान देऊन ते मिळवले आहे. आज देश स्वातंत्र्यात; परंतु आतंकवाद, धर्मांतर, आरक्षण, जातीयवाद, घुसखोरी, लव्ह जिहाद, स्त्रियांवरील अत्याचार, सर्वच क्षेत्रांतील भ्रष्टाचार अशा समस्यांनी त्रस्त आहे. या सर्व समस्यांच्या निराकरणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे रामदासस्वामी आणि संत तुकाराम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य निर्माण केले, त्याचप्रमाणे आदर्श आणि अखंड भारतासाठी संतांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्र आणि धर्माचे कार्य साधना म्हणून करायला हवे. प्रत्येकाने त्यासाठी प्रतिदिन एक घंटा द्यावा.’’