प्रयाग (उत्तरप्रदेश) : बकरी ईदच्या दिवशी कापल्या जाणार्या जनावरांमुळे होणार्या प्रदूषणाच्या विरोधात पर्यावरणप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी २२ ऑगस्ट या दिवशी सिव्हिल लाईन येथे लाक्षणिक उपोषण करून विरोध केला. तसेच जनावरांचा बळी न देता केवळ शेवयांची खीर खाऊन प्रदूषणरहित ‘इको फ्रेंडली’ ईद साजरी करण्याचे आवाहन केले. या वेळी त्यांनी, ‘होळी, दिवाळी, श्री गणेश चतुर्थी, नवरात्री इत्यादी सणांच्या वेळी प्रदूषणाचा कांगावा करणारे तथाकथित पर्यावरणवादी बकरी ईदच्या वेळी कुठे असतात ?
त्यांना बकरी ईदच्या वेळी होणारे प्रदूषण दिसत नाही का ?’, असे प्रश्नही विचारले. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अधिवक्ता आणि ‘एनिमल फार्म’चे अवधेश राय यांनी पर्यावरणप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना येथे संघटित केले होते. या वेळी शिवसेना, हिंदू युवा वाहिनी, युवा सेना, हिंदु जनजागृती समिती, विश्व हिंदू परिषद (गोरक्षा) या संघटनांचे कार्यकर्ते, तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अनेक अधिवक्ता, व्यापारी, पत्रकार यांनी यात सहभाग घेतला होता.
‘पेटा’ संघटनेचे ढोंगी प्राणीप्रेम !
हिंदूंच्या बळी प्रथेचा विरोध करणार्या ‘पेटा’ (पीपल फॉर द अॅथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल) नावाच्या प्राणीमित्र संघटनेच्या साहाय्य क्रमांकावर संपर्क केल्यावर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दूरभाष उचलला नाही. शेवटी आपत्कालीन क्रमांकावर संपर्क केल्यावर संघटनेकडून ‘बकरी ईदच्या वेळी होणार्या जनावरांच्या हत्येविषयी पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे जा’, असा सल्ला दिला. (याचा अर्थ ‘पेटा’ला गोहत्या चालते, हे स्पष्ट होते ! अशा संघटनेला मिळेल तेथे जाब विचारा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात