Menu Close

हिंदूंमध्ये शौर्य जागवणे आवश्यक : चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

गाझियाबाद येथे ‘अखंड भारत संकल्प दिवस’ कार्यक्रमात सहभाग

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) : अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आदी भारतीय उपखंडातील देशांना एकत्रित करून भारताला पुनश्‍च अखंड भारत बनवण्याचा ‘संकल्प दिवस’ प्रतिवर्षी विश्‍व हिंदु परिषद साजरा करत आहे. या दिवशी शेकडो हिंदु युवक देशाच्या पुनर्स्थापनेसाठी प्रतिज्ञाबद्ध होतात, हे महत्त्वपूर्ण आहे. संकल्प दिवस हा वार्षिक उपक्रम नाही, तर वर्षभर म्हणजे ३६५ दिवस कृती करण्याचा ‘संकल्प दिवस’ आहे. अखंड भारत सहज मिळणारे नाही, त्यासाठी शौर्याची पराकाष्ठा करावी लागेल. यासाठी सर्वप्रथम हिंदूंमध्ये शौर्य जागवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी येथे केले. विहिंपच्या गाझियाबाद शाखेकडून आयोजित करण्यात आलेल्या अखंड भारत संकल्पदिवसाच्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानी होते.

या वेळी विहिंपचे प्रांत सहसंयोजक अधिवक्ता विनायक भाटी म्हणाले, ‘‘हिंदु समाजासाठी काम करायला मिळणे, हे आपले पूर्वसुकृत आहे. यासाठी ईश्‍वरचरणी कायम कृतज्ञ रहा.’’ कार्यक्रमाची प्रस्तावना विहिंपचे महानगर अध्यक्ष अधिवक्ता विनय कक्कड यांनी केली. या कार्यक्रमाला १०० युवक उपस्थित होते.

मोदीनगर येथे हिंदु राष्ट्र-जागृतीसाठी हिंदूसंघटन बैठक

मोदीनगर : वर्तमान धर्मनिरपेक्ष व्यवस्थेत हिंदु समाजाला राज्यघटनात्मक संरक्षण नसल्याने भारताला हिंदु राष्ट्र बनवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी मोदीनगर येथील हिंदूसंघटन बैठकीत केले. या बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आर्य निर्मात्री सभा, गायत्री परिवार, भारत स्वाभिमान, हिंदु युवा वाहिनी, हिंदु स्वाभिमान, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे जिल्हास्तरीय प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत मासातून एकदा हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍या संघटनांच्या प्रमुखांची हिंदु राष्ट्र जागृतीसाठी एकत्रित बैठक करण्याचे निश्‍चित झाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *