‘हिंदु धर्माच्या समृद्धीसाठी कार्यरत असणार्या विहिंपचे न्यायालयाकडून कौतुक !
घरवापसीला विरोध करणारे आता काही बोलतील का ?
चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाने एका ख्रिस्ती महिलेला पुन्हा हिंदु धर्मात घेण्यासाठी विश्व हिंदु परिषदेने आयोजित केलेल्या शुद्धीकरण सोहळ्याला योग्य ठरवले आहे. तसेच या महिलेला अनुसूचित जातीच्या अंतर्गत कनिष्ठ पदवीधर शिक्षक या पदावरील तिची नियुक्तीही वैध ठरवली आहे. न्यायालयाने सांगितले, ‘अशा प्रकारे धर्मांतर केल्यानंतर संबंधितांना जातीनुसार लाभ यापूर्वीही देण्यात आल्याचे निर्णय न्यायालयाने दिले आहेत.’ या महिलेने हिंदु धर्म स्वीकारल्याने तिची कनिष्ठ पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती थांबवण्यात आली होती. (इतर धर्मांत प्रवेश करणार्यांना असे त्रास होत नाहीत; मात्र ‘घरवापसी’ (हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) करणार्यांना असा त्रास दिला जातो ! हिंदूबहुल भारतात असे होणे, हे संतापजनक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ‘धर्मपरिवर्तन केल्यावर जोपर्यंत अनुसूचित जातीचा समाज तिला स्वीकारत नाही, तोपर्यंत तिला त्या जातीचे मानू शकत नाही’, असे सांगण्यात आले होते. या संघटनेने १ नोव्हेंबर १९९८ मध्ये ‘शुद्धि सतंगु’ (शुद्धीकरण) आयोजित केले होते. यानंतर संबंधित ख्रिस्ती महिलेने हिंदु धर्म स्वीकारला. त्यानंतर तिचे ‘डेजी फ्लोरा’ नाव पालटून ‘ए. मेगलई’ ठेवण्यात आले.
विहिंप हिंदु धर्माच्या महानतेचा प्रसार करत आहे ! – मद्रास उच्च न्यायालय
न्यायालयाने निर्णय देतांना म्हटले की, हिंदु धर्मातील सर्वांत प्रतिष्ठित आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रख्यात संघटनांमध्ये एक असलेली विश्व हिंदु परिषद सातत्याने हिंदु धर्माची महानता, समृद्धी आणि हिंदु परंपरा यांचा देशात प्रसार करत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात