सर्वच उत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याचा मंडळांचा निर्धार !
नंदुरबार : नंदुरबार येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सार्वजनिक उत्सव समन्वय शिबीर येथील दत्त मंदिरात २२ ऑगस्ट या दिवशी पार पडले. या शिबिराद्वारे सहभागी मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सर्वच उत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार केला.
सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक दृष्टीने उत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याची आवश्यकता, या विषयावर सनातन संस्थेच्या सौ. निवेदिता जोशी यांनी या वेळी मार्गदर्शन केले. सार्वजनिक उत्सव आदर्श पद्धतीने कसे साजरे करावे ?, या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले. शेवटी आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा? या विषयावर गटचर्चा घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजू चौधरी यांनी केले.
गटचर्चेचे फलित
- या वेळी आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा या विषयीच्या ४ सहस्र ५०० हस्तपत्रकांची मागणी करण्यात आली.
- श्री गणेशाय नमः या नामजपाच्या नामपट्ट्यांची मागणी करण्यात आली.
- आजोबा गणेश मंडळ आणि सुवर्णकार गणेश मंडळ यांनी आदर्श गणेशोत्सव कसा असावा ? कसा असू नये ? या विषयाची ध्वनीचित्रफीत दाखवण्याची इच्छा दर्शवली.
मंडळ पदाधिकार्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया
१. आजच्या कार्यक्रमातून जे धर्मशिक्षण दिले जात आहे, ते व्यापक प्रमाणात झाले पाहिजे. या माध्यमातून लोकांचे प्रबोधन केले गेले पाहिजे. गणपतीची स्थापना, पूजाअर्चा, विसर्जन कसे करावे याविषयी प्रबोधनात्मक फ्लेक्स सगळ्यांनी लावावे. तसेच सगळ्या मंडळांनी गणेशमूर्तींचे विसर्जन वेळेत करावे. जे लोक धर्माला नावे ठेवतात त्यांनी खुशाल धर्मपरिवर्तन करून दुसर्या धर्मात जावे. – प्रकाश जोहरी, अध्यक्ष, जोहरी गणेश मंडळ
२. लोकमान्य टिळकांचा उद्देश सध्याच्या गणेशोत्सवातून साध्य होतांना दिसत नाही. देखावे करतांना ते धर्मप्रबोधनपर, हिंदु संस्कृतीवर आधारित असावेत आणि या माध्यमातून धर्महानी रोखण्याचा प्रयत्न करावा. – संतोष माळी, सचिव-आण्णा गणेश मंडळ
३. मिरवणूक लवकर काढून लवकर विसर्जन करावी. – पंकज तांबोळी, सचिव, दत्त मंडळ
४. गणेशोत्सव धार्मिक पद्धतीने साजरा करावा. आपण संघटित झालो, तर धर्मरक्षण होईल. गल्लीगल्लीत गणपति बसवण्याऐवजी किमान एक चौक एक गणपति असावा. गणेशोत्सवात कुठलाही अपप्रकार होऊ नयेत, यासाठी मंडळांनी सतर्कता बाळगावी. संस्कृती आणि धर्माचरणाला धरूनच देखावे असावेत. – अमन जोहर, हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता
वैशिष्ट्यपूर्ण
- आदर्श गणेशोत्सव कसा असावा ? कसा असू नये ? याविषयीच्या ध्वनीचित्रफितीची यूट्युब लिंक आम्हाला मिळाल्यास आम्ही ती खेडोपाडी पोहोचवू, असा उत्स्फूर्त प्रतिसाद उपस्थितांनी दिला.
- आता ज्याप्रमाणे शिबिरातून आमचे प्रबोधन झाले, त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासाठी आम्ही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करून समितीला निमंत्रित करू, असे उपस्थितांनी सांगितले.
- मूर्तीकारांचे प्रबोधन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना बोलावून आम्ही त्यांच्यासमवेत प्रबोधन करू, असे मंडळाच्या पदाधिकार्यांनी सांगितले.
- यापुढे तळोद्यात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यक्रमाला ध्वनीक्षेपण साहित्य विनामूल्य उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन प्रदीप जव्हेरी यांनी दिले.
- जोहारी समाजाचे गणेश मंडळाचे पदाधिकारी अन्य एका कार्यक्रमाला न जाता प्रबोधनाच्या कार्यक्रमाला प्राधान्य देऊन शिबिरासाठी उपस्थित होते.
- शिबिर संपल्यानंतर एका मंडळाचे पदाधिकारी म्हणाले, आम्ही इतका वेळ कधीही बसत नाही. पण आज २.३० घंटे कुठे गेले ? हे कळले नाही आणि अजूनही उठून जाण्याची इच्छा नाही.