हिंदुत्वनिष्ठांकडून चौकशीची मागणी !
बकरी ईदनंतर असे प्रकार उघडकीस येतात. गोवंश हत्याबंदी कायद्याचा कुणाला धाकच वाटत नसल्याचाच हा दुष्परिणाम आहे !
नंदुरबार : येथील कचरा डेपोवर शेकडो टन मांस आणि गुरांचे अवशेष आढळले असून हे गोवंशियांचे मांस असल्याच्या संशयावरून हिंदुत्वनिष्ठांनी चौकशीची मागणी केली. यानंतर या संदर्भात गुन्हा नोंद झाल्याचे समजते.
२२ ऑगस्टला बकरी ईद होती, तर २३ ऑगस्ट या दिवशी हा प्रकार उघडकीस आला. कचरा आणून टाकणार्या काही वाहनचालकांच्या वरील प्रकार लक्षात आला. ‘मांसाचे ढीग पहाणे शक्य झाले नाही’, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. काही कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या ट्रॅक्टरमधून मांस वाहून आणलेची तक्रार दिली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात