मुंबई : सनातन संस्थेवर होणार्या अन्यायकारक बंदीच्या मागणीच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांच्या शिष्टमंडळाकडून विविध लोकप्रतिनिधींना निवेदने देण्यात आली. कोणत्याही अन्वेषण यंत्रणांनी सनातन संस्थेचे नाव घेतले नसतांनाही पुरोगामी आणि स्वतः न्यायाधिशाच्या भूमिकेत गेलेली प्रसारमाध्यमे कशा प्रकारे सनातन संस्थेच्या बंदीची मागणी करत आहेत; हिंदुत्वनिष्ठांचा कशा प्रकारे नाहक छळ केला जात आहे आणि काही राजकीय पक्ष त्यातून स्वतःची पोळी कशी भाजून घेत आहेत, याविषयी निवेदनात माहिती देण्यात आली आहे.
सनातनचे धर्मप्रसारक श्री. अभय वर्तक आणि प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना या संदर्भातील निवेदन दिले. सनातनचे धर्मप्रसारक श्री. अभय वर्तक आणि प्रवक्त्या सौ. नयना भगत आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी उद्योग आणि खाण राज्यमंत्री, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम श्री. प्रवीण पोटे पाटील यांना वरील विषयाच्या संदर्भात निवेदन दिले.