- पाश्चात्त्य उपचारपद्धतीचा (अॅलोपॅथीचा) उदोउदो करणार्यांनो, आयुर्वेदाचे महत्त्व जाणा आणि त्याच्या संवर्धनासाठी कृतीशील व्हा !
- आता अमेरिका अभ्यास करून भारतियांपुढे आयुर्वेदाचे महत्त्व मांडेल, तेव्हा आपल्याला ते समजणार आहे का ?
वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या संयुक्त नेतृत्वाने दोन्ही देश आयुर्वेदाच्या प्रसारासाठी कार्य करणार आहेत. आयुर्वेदातील उपचारांचा विशेषत: कर्करोगांवरील उपचारांचा सखोल अभ्यास करून ही चिकित्सा पद्धत संपूर्ण जगासमोर आणण्याचा अमेरिकेचा मानस आहे.
१. अमेरिकेच्या ९ सदस्यांनी आयुर्वेदाच्या अभ्यासासाठी काशी हिंदु विश्वविद्यालयाला भेट दिली.
२. आयुर्वेदातील चिकित्सा पद्धती आणि औषधे यांचा जगभरातील प्रभाव आणि मिळणारे यश पाहून ती जगभरात लागू करण्याच्या दृष्टीने पावले टाकली जातील, असे अमेरिकेच्या आरोग्य मंत्रालयाचे साहाय्यक सचिव जिम्मी कोल्कर यांनी म्हटले आहे.
३. या मोहिमेच्या अनुषंगाने नवी देहली येथे ३ आणि ४ मार्च या दिवशी आयुष मंत्रालयाकडून इंडो-अमेरिका पारंपरिक औषधी आयुर्वेदाशी संबंधित २ दिवसीय कार्यशाळा झाली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात