मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !
पंढरपूर : येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील लाडू विक्रीच्या रकमेतील ३ लाख ५० सहस्र रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणी कर्मचारी मोहन औसेकर याला मंदिर समितीने काही दिवसांसाठी निलंबित केले आहे. (एवढ्या मोठ्या चुकीसाठी काही दिवस निलंबन ही छोटी शिक्षा नव्हे का ? अशाने अन्य कर्मचार्यांना वचक कसा बसेल ? यामुळेच मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणून मंदिरे भक्तांच्या कह्यात देण्याची हिंदुत्वनिष्ठ मागणी करतात. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
आषाढी यात्रेच्या कालावधीत येथे मोठ्या संख्येने भाविक येतात, तसेच प्रसाद लाडूचीही मोठ्या प्रमाणात विक्री होते. या संधीचा अपलाभ घेऊन औसेकर याने हा गैरव्यवहार केला. हा प्रकार मंदिर समितीच्या निदर्शनास येताच औसेकर याची चौकशी करून रक्कम परत घेतली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात