‘टीव्ही ९ मराठी’ वृत्तवाहिनीचा खोटारडेपणा !
या वृत्तावरूनच ‘टीव्ही ९ मराठी’ वृत्तवाहिनी सनातन संस्थेविषयी कशा प्रकारे खोट्या बातम्या प्रसारित करते, हे लक्षात येते ! अशांमुळे प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता अल्प होऊन त्यांचे समाजात हसे होत आहे ! अशा खोटारड्या प्रसारमाध्यमांवर कठोर कारवाई करणारी यंत्रणा केंद्र सरकारने निर्माण करायला हवी !
मुंबई : आतापर्यंत झालेल्या अटकसत्रांनंतर सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक आणि श्री. विवेक नाफडे, तसेच इतर संशयित हे सध्या अंडरग्राऊंड (भूमीगत) आहेत. ते देश सोडून पसार होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे, असे धादांत खोटे वृत्त ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीने २६ ऑगस्ट या दिवशी दिले. (सनातनच्या विरोधात काही ‘सनसनाटी’ मिळत नसल्याने ‘टीव्ही ९ मराठी’ वृत्तवाहिनी कशा प्रकारे कपोलकल्पित कथा रचून सनातनच्या साधकांची अपकीर्ती करते, याचे हे बोलके उदाहरण आहे ! अशा वृत्तवाहिन्या पत्रकारितेला कलंकित करतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या प्रकरणी श्री. अभय वर्तक आणि श्री. विवेक नाफडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘आमच्याविषयी खोटे वृत्त देऊन आमची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी या वृत्तवाहिनीवर कायदेशीर कारवाई होण्यासाठी अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहोत’, असे सांगितले. (श्री. वर्तक आणि श्री. नाफडे यांच्याविषयी असे वृत्त प्रसिद्ध करण्यापूर्वी ‘टीव्ही ९ मराठी’ने त्यांच्याशी संपर्क करून किंवा सनातन संस्थेच्या प्रवक्त्यांशी संपर्क करून निश्चिती करण्याचा प्रयत्न केला नाही. यावरून त्यांची एकांगी, एकतर्फी आणि सनातनद्वेषी पत्रकारिता लक्षात येते ! यालाच पीत पत्रकारिता म्हणतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात