मूळ सौदी अरेबियाची नागरिक असलेली आणि सध्या स्वीडन येथे वास्तव्य करणार्या महिलेचे विधान !
- भारतातील तथाकथित पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, हिंदुद्वेषी आणि असहिष्णुता वाढल्याची आरोळी ठोकणारे यांना चपराक !
- जे एका सौदी अरेबियातील महिलेला कळते, ते भारतातील पुरो(अधो)गाम्यांच्या टोळ्यांना कळत नाही, हे संतापजनक !
नवी देहली : मी स्वत: भारतीय नाही; पण मी हे निश्चित सांगू शकते की, भारतामधील मुसलमान जगातील इतर कोणत्याही इस्लामी देशांमध्ये रहाणार्या मुसलमानांंपेक्षा अधिक सुरक्षित आहेत; कारण जगातील सर्वच इस्लामी देशांमध्ये शरीया कायद्याचे पालन केले जाते. हा कायदा एकपक्षीय आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करणारा आहे, असे विधान मूळची सौदी अरेबियातील असणारी आणि आता स्वीडनमध्ये रहाणारी मुसलमान महिला आयशा फाहदा यांनी केले आहे. प्रश्नोत्तरे आणि चर्चा यांसाठी लोकप्रिय असणार्या क्वोरा या संकेतस्थळावर एका प्रश्नाचे उत्तर देतांना त्यांनी हे विधान केले. हे उत्तर सामाजिक माध्यमातून सर्वत्र प्रसारित होत आहे.
क्वोरा संकेतस्थळावर एका व्यक्तीने पाकिस्तान, तुर्कस्थान आणि सौदी अरेबिया एकत्रितपणे भारतीय मुसलमानांना वाचवण्यासाठी भारतावर आक्रमण का करत नाहीत ? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला १०० हून अधिक जणांनी उत्तरे दिली आहेत; मात्र या सर्वांमध्ये आयशा यांच्या उत्तराला वाचकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे.
आयशा फाहदा हिने दिलेल्या उत्तरातील पुढील सूत्रे
१. माझे संपूर्ण बालपण सौदी अरेबियामध्ये गेले आहे. मी ६ वर्षांची होती, तेव्हापासून मी अनेकदा सार्वजनिक ठिकाणी देण्यात येणारी मृत्यूदंडाची शिक्षा स्वत:च्या डोळ्यांनी पाहिली आहे. इस्लाम धर्म सोडला म्हणून एकाला मृत्यूदंड दिल्याचे मी पाहिले आहे. चोरी केली म्हणून एका चोराचा डावा हात कापलेला मी पाहिला आहे. सर्वांत भयंकर म्हणजे इस्लाममध्ये समलैंगिकता हा गुन्हा असल्याने ३ समलैंगिक तरुणांना एका उंच इमारतीवरून धक्का देऊन मृत्यूदंडाची शिक्षा दिल्याचेही मी पाहिले आहे.
२. इस्लामी देशांमध्ये अशा प्रकारच्या क्रूर शिक्षा दिल्या जातात; कारण त्या देशांचा कारभार हा शरीया कायद्याप्रमाणे चालतो.
३. दुसरीकडे भारतामधील कारभार हा भारतीय राज्यघटनेला अनुसरून चालतो. भारतीय राज्यघटनेमध्ये मानवाधिकार आणि स्त्री-पुरुष समानता याला महत्त्वाचे स्थान आहे. भारत हा जगातील सर्वोत्तम प्रजासत्ताक देशांपैकी एक आहे.
४. माझा प्रियकर भारतीय आहे. आम्ही मागच्या वर्षी भारतामध्ये जाऊन आलो. म्हणूनच मी माझ्या स्वत:च्या अनुभवावरून हेच सांगू शकते की, भारतीय लोक खूप मोठ्या मनाचे आहेत. ते खूप धर्मनिरपेक्ष आहे. त्यांच्या इतके धर्मनिरपेक्ष होणे कदाचित् आपल्याला कधीच जमणार नाही.
५. मी स्वत: आज सौदी अरेबियामध्ये रहात असते, तर आतापर्यंत माझा शिरच्छेद करण्यात आला असता; कारण मी अनेक पार्ट्यांना जाते आणि व्हिस्की, तसेच वाईनचेही सेवन करते.
६. त्यामुळे पाकिस्तान, तुर्कस्थान आणि सौदी अरेबिया यांनी भारतीय मुसलमानांना वाचवण्याऐवजी स्वत:च्या देशामधील लोकांच्या हिताची काळजी करण्यावर भर द्यायला हवा. भारतामधील मुसलमान सुरक्षित आणि सुंदर जीवन जगत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments