Menu Close

हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची मागणी करावी : रमेश शिंदे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

राजस्थानमध्ये हिंदु राष्ट्र संपर्क अभियान

बैठकीत चर्चा करतांना डावीकडून श्री. आनंद जाखोटिया, श्री. रमेश शिंदे आणि उपस्थित धर्माभिमानी

श्री माधोपूर (राजस्थान) : आज देशात गोहत्याबंदी, राममंदिर, लव्ह जिहाद आदी विविध विषयांवर कुणी ना कुणी लढत आहे; मात्र समस्या तर वाढतच जात आहे. यासाठी भारत लवकरात लवकर हिंदु राष्ट्र घोषित होण्यासाठी प्रयत्न करणे, हाच या सर्व समस्यांवरील एकमात्र उपाय आहे. आज भारतात बहुसंख्य हिंदु असतांनाही भारत हिंदु राष्ट्र नाही. सर्व हिंदूंनी हिंदु राष्ट्राची मागणी केली पाहिजे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती हिंदु राष्ट्र संपर्क अभियान राबवत आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी येथे केले. हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाचे येथील वाचक श्री. देवीलाल कटारिया यांनी आयोजित केलेल्या एका बैठकीत श्री. शिंदे बोलत होते. या वेळी समितीचे राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया हेही उपस्थित होते. या बैठकीमध्ये गावातील ३ मंदिरांमध्ये धर्मजागृती फलक लावण्याचे निश्‍चित करण्यात आले, तसेच लवकरच सर्व संघटनांच्या सदस्यांच्या एका बैठकीचे आयोजन करण्याचे निश्‍चित करण्यात आले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *