Menu Close

वणी (यवतमाळ) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

‘हिंदु आतंकवादाचा’ ढोल बडवून हिंदूंचा अवमान करणे बंद करा ! – हिंदु जनजागृती समिती

वणी (यवतमाळ) : येथील तहसील चौक येथे २५ ऑगस्टला दुपारी १ ते ३ या वेळेत राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी श्री. लोभेश्‍वर टोंगे यांनी ‘संपूर्ण देशातील घुसखोर मुसलमानांना देशाबाहेर हाकलणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले, तर कागदी लगद्याच्या प्रदूषणकारी श्रीगणेशमूर्ती सिद्ध करण्यास शासनाने प्रोत्साहन देऊ नये, असे मत प्रवीण ढेंगळे यांनी व्यक्त केले. ‘हिंदु आतंकवादा’चा ढोल बडवून हिंदूंचा अवमान करणे बंद करा’, असे मत लहू खामणकर यांनी व्यक्त केले.

या आंदोलनात ७ हिंदुत्वनिष्ठांसह २७ जणांनी सहभाग घेतला, तर १२५ जणांनी निवेदनांवर स्वाक्षर्‍या केल्या. निवेदन २७ ऑगस्टला उपविभागीय अधिकारी कार्यालयात दिले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *