आंध्रप्रदेशमधील नास्तिकतावादी आणि तथाकथित पुरो(अधो)गामी संघटनांनी ‘एकवेळ सर्पदंशाने लोकांचा मृत्यू झाला, तरी चालेल; मात्र सर्पयज्ञासारखे विधी करू नयेत’, असे म्हटले तर नवल नाही !
कृष्णा (आंध्रप्रदेश) : जिल्ह्यातील दीवीसीमा भागामध्ये जुलै मासापासून सुमारे १०० गावकर्यांना साप चावल्याने रुग्णालयात भरती करावे लागले, तर २ जण सर्पदंशाने मृत्यूमुखी पडले आहेत. या घटनांमुळे राज्य सरकार ‘सर्प शांती यज्ञ’ करणार आहे. येत्या २९ ऑगस्टला मोपीदेवी येथील श्री सुब्रह्मण्येेश्वर स्वामी मंदिरात हा यज्ञ होणार आहे.
१. कृष्णा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि न्यायदंडाधिकारी बी. लक्ष्मीकांतम् म्हणाले, ‘‘प्रतिबंधात्मक पावले उचलल्याने सर्पदंशाचे प्रकार न्यून झाले आहेत. स्थानिक आणि धर्मादाय विभागाच्या संयुक्त विद्यमाने सर्प शांती यज्ञ होत आहे. विषप्रतिबंधक, तसेच सर्पदंशावरील औषधे दिल्यानंतर तसेच सर्पदंशांविषयीची व्यापक जनजागृती केल्यानंतर आता लोकांच्या मानसिक काळजीपोटी हा यज्ञ केला जाणार आहे.’’
२. सुब्रह्मण्येश्वर स्वामी मंदिराचे कार्यकारी अधिकारी एम्. शारदा यांनी सांगितले, ‘हा यज्ञ १५ पुरोहित करणार आहेत. ‘सर्पसूक्ता’चा जप या वेळी करण्यात येईल.’
३. जिल्हा प्रशासनाने प्रत्येक गावात सर्प पकडू शकणार्या दोघांना तैनात ठेवले आहे. २ दिवसांत त्यांनी ६ साप पकडले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात