हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी अधिवक्त्यांनी साधना करण्याची नितांत आवश्यकता : अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद
लक्ष्मणपुरी (लखनौ) : धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंवर सतत अन्याय होत आहे. यासाठी हिंदु राष्ट्र अनिवार्य आहे. हिंदूंमध्ये धर्मबंधुत्व निर्माण झाले, तरच हिंदु संघटित होतील. साधना केल्यानेच धर्मबंधुत्व निर्माण होते. यासाठी अधिवक्ता हे समाजात जागृती करून हिंदु समाजाला योग्य दिशा देऊ शकतात. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी अधिवक्त्यांचे संघटन करण्याची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी काढले. येथे आयोजित करण्यात आलेल्या अधिवक्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता सुरेश कुलकर्णी आणि हिंदू फ्रंट फॉर जस्टिसचे अध्यक्ष अधिवक्ता हरि शंकर जैन उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन अधिवक्ता जैन यांनी केले होते. या बैठकीला १२० अधिवक्ते उपस्थित होते.
१. अधिवक्ता सुरेश कुलकर्णी म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अधिवक्त्यांचे मोठे योगदान होते. याचप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी अधिवक्त्यांनी योगदान देणे पुष्कळ आवश्यक आहे.
२. हिंदु महासभेचे अधिवक्ता शिशिर चतुर्वेदी म्हणाले, प्रतिदिन न्यायालयात लव्ह जिहादच्या जाळ्यात फसलेल्या हिंदु मुली विवाह करण्यासाठी येतात. त्यांना यातून सोडवण्यासाठी अधिवक्त्यांनी पुढे यायला हवे.
३. बैठकीच्या अंती अनेक अधिवक्त्यांनी आम्हाला या कार्यात सहभागी व्हायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली.