ठाणे : भिवंडी येथील भादवड गावात १ मार्च २०१६ या दिवशी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात हिंदु संघटनासाठी गावकर्यांनी बैठक घेतली. या बैठकीला ८० धर्माभिमानी ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी सर्वांनी हिंदु धर्मावरील आघात आणि हिंदूंना धर्माशिक्षणाची आवश्यकता या विषयांवर चर्चा करून हिंदूसंघटन करण्यासाठी हिंदु धर्मजागृती सभा घेण्याचे निश्चित केले. तसेच गावातील हिंदूंच्या स्थानिक समस्यांवर उपाय काढण्याविषयी चर्चा केली.
या वेळी ग्रामस्थांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून सभेचे स्वरूप आणि सभेसाठी आवश्यक सर्व सेवा समजून घेतल्या. सभेचा प्रसार करण्यासाठी गावातील मान्यवर व्यक्तींना भेटणे आणि घराघरांमध्ये जाणे याविषयी नियोजन केले. तसेच गावातील महिलांची अशीच बैठक होण्यासाठी रविवारचा दिवस निश्चित केला.
या बैठकीला विश्व हिंदू परिषदेचे भिवंडी जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. चिंतामणी महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभली. उरण येथे आगरी साहित्य विकास मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने झालेल्या आगरी साहित्य परिषदमध्ये त्यांचा रायगडचे आमदार श्री. मनोहर भोईर यांच्या हस्ते राज्यस्तरीय वारकरी आगरी भूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला होता. या सत्काराविषयी ग्रामस्थांच्या वतीने शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या बैठकीला समितीचे सर्वश्री विश्वनाथ कुलकर्णी, प्रशांत सुर्वे, ओंकार कानडे हे उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात