चंदौली (उत्तरप्रदेश) : येथील राम वाटिका सभागृहामध्ये एम्पॉवरमेंट सोसायटी आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्तरित्या हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन केले होते. यात एम्पॉवरमेंट सोसायटीचे सचिव डॉ. ए.के. सिंह आणि अध्यक्ष श्री. राजेश तिवारी सहभागी झाले होते. या वेळी समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांचे समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी मांडलेला विषय ऐकून उपस्थितांना हिंदु राष्ट्राची आवश्यकता का आहे?, हे लक्षात आले. तसेच धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली देशात हिंदूंशी होत असलेल्या भेदभावाची माहिती मिळाली.
हिंदु युवा वाहिनीचे उत्तरप्रदेश उपाध्यक्ष श्री. मनीष पाण्डेय म्हणाले, आम्ही सदैव सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या हिंदु राष्ट्र स्थापनेविषयीच्या उपक्रमांमध्ये सोबत राहू आणि वर्ष २०२३ पर्यंत भारताला हिंदु राष्ट्र बनवू.
क्षणचित्र : उपस्थितांपैकी अनेकांनी प्रत्यक्ष आणि अभिप्राय लिहून देऊन ते हिंदु राष्ट्र जागृती बैठक आणि सभा यांचे आयोजन करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले.