सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात लोकप्रतिनिधींना निवेदने : लोकप्रतिनिधींचा सकारात्मक प्रतिसाद !
पुणे : सनातन संस्था समाजसाहाय्य आणि राष्ट्ररक्षण यांचे व्यापक कार्य करत आहे. भ्रष्टाचार, जनतेची लुटालूट, अन्यायाविरोधात वैध मार्गाने लढा देत आहे. नालासोपारा प्रकरणात अटक करण्यात आलेले कोणीही सनातन संस्थेचे साधक नसतांना संस्थेवर बंदी आणण्याची पूर्वग्रहदूषितपणे मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सनातन संस्थेवर बंदी आणण्याच्या षड्यंत्राला विरोध करण्यासाठी, तसेच अशा प्रकारचा प्रस्ताव शासनाकडे आल्यास तो फेटाळण्यात यावा या मागणीसाठी भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन पाहून ते म्हणाले, मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना हे निवेदन पाठवतो आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलून चर्चाही करतो. चांगले कार्य करणार्यांनाच त्रास सहन करावा लागतो. सनातन संस्थेच्या संदर्भात चाललेल्या अन्याय्य प्रकाराविषयी त्यांनी खेद व्यक्त केला. निवेदन देतांना गार्गी सेवा फाऊंडेशनचे श्री. विजय गावडे हेही उपस्थित होते.
भाजपचे आमदार श्री. भीमराव तापकीर यांना निवेदन दिल्यावर त्यांनीही न्यायालयीन प्रक्रियेच्या आधीच अशा प्रकारे बंदी आणता येऊ शकत नाही, असे सांगत मी तुमच्यासह आहे, असे साधकांना आश्वस्त केले. अशाच प्रकारे भाजपचे आमदार सर्वश्री महेश लांडगे, लक्ष्मण जगताप यांना निवेदन देण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात