तथाकथित निधर्मी प्रसारमाध्यमे या घटनेवर चर्चासत्र आयोजित करतील का ?
पुणे : कुटुंबाशी असलेल्या ओळखीचा अपलाभ घेऊन १९ वर्षीय तरुणीला शिकवण्याचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार करणारा मौलवी युनीस हासीम शेख (वय ५० वर्षे) याला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पीडित तरुणीने तक्रार दिली होतो. त्याने तिच्याकडून तिची मूळ शैक्षणिक कागदपत्रे घेतली. ती कागदपत्रे तरुणीला न देता स्वत:कडेच ठेवून ती नष्ट करण्याची, तसेच तिचे आणि तिच्या आई-वडिलांचे बरेवाईट करण्याचीही धमकी देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तिचे अश्लील चित्रीकरण करून आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. तिला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्याने इतर साथीदारांचेही साहाय्य घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी सरकारी अधिवक्त्यांनी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात