Menu Close

(म्हणे) ‘हा सनातनवरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न !’ – शरद पवार यांचा जावईशोध

पवार यांच्याकडून नक्षलप्रेमींचे समर्थन

  • शरद पवार स्वतः मुख्यमंत्री असतांना वर्ष १९९३ च्या मुंबईतील बॉम्बस्फोटांमध्ये जिहादी आतंकवादी आणि धर्मांध यांचा समावेश असल्याने त्यांच्यावरून लोकांचे लक्ष हटावे, यासाठी ‘मुसलमानबहुल भागातही बॉम्बस्फोट झाला’ अशी खोटी माहिती देऊन हिंदूंची दिशाभूल केली होती. हे त्यांनीच यापूर्वीच जाहीररित्या सांगितले आहे. त्यामुळे धर्मांधांना, जिहादी आतंकवाद्यांना आणि आता नक्षलप्रेमींना पाठिंबा देणारे शरद पवार असे विधान करून लोकांची पुन्हा एकदा दिशाभूल करत आहेत !
  • मालेगाव बॉम्बस्फोटाच्या वेळीही शरद पवार यांनी ‘यात मुसलमान असू शकत नाही’, असे सांगून अन्वेषणाची दिशा पालटून ती हिंदुत्वनिष्ठांच्या दिशेने वळवली आणि ‘हिंदु आतंकवाद’ नावाचे चित्र निर्माण केले ! ‘तेच शरद पवार नक्षलप्रेमींना पाठिंशी घालत आहेत’, हे लक्षात घ्या !

नवी देहली : पुणे पोलिसांनी साम्यवादी विचारांच्या ज्यांना अटक केली, त्यांपैकी अनेकांना मी ओळखतो. त्यांची कोणतीही विचारसरणी असली, तरी ते नक्षलवादी नक्कीच नाहीत, याची मला खात्री आहे. (शहरी नक्षलवादी अत्यंत शांतपणे आणि गोपनीयरित्या त्यांचे कट कारस्थान रचत आहेत, हे स्पष्ट आहे आणि त्यांना तथाकथित पुरोगामी राजकीय नेत्यांचे समर्थन आहे; कारण हे शहरी नक्षलवादी हिंदुत्वाच्या विरोधात कार्य करत आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यांच्या घरी जाऊन मी सारे तपशील समजावून घेणार आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले. (‘भारतात शहरी नक्षलवाद का फोफावला ?’, हे पवार यांच्या या विधानावरून स्पष्ट होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ‘कर्नाटक आणि महाराष्ट्र येथे सनातन संस्थेच्या काही सदस्यांना अटक झाल्यानंतर जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने बहुदा हे अटक आणि धाडसत्र केले असावे, अशी माहिती समजली आहे’, असेही ते म्हणाले. (नालासोपारा प्रकरणात आतापर्यंत अटक झालेले संशयित सनातन संस्थेचे साधक नाहीत, हे सनातनने अनेकदा स्पष्ट केलेले आहे, तरीही जाणीवपूर्वक ‘गोबेल्स’ पद्धतीने ‘ते सनातनचेच आहेत’, अशा प्रकारचा प्रचार केला जात आहे, त्याचेच हे एक उदाहरण होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *