Menu Close

अमरावती आणि वर्धा येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने रक्षाबंधन !

राज्यमंत्री आणि पालकमंत्री श्री. प्रवीण पोटे यांना राखी बांधतांना हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अनुभूती टवलारे
शिवसेनेचे अमरावती विधानसभा संघटक श्री. नरेंद्र केवले यांना राखी बांधतांना सनातन संस्थेच्या सौ. अर्चना रावळे

अमरावती : येथील हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, हिंदुत्वनिष्ठ तसेच हितचिंतक यांना राखी बांधण्यात आली. या वेळी राज्यमंत्री आणि पालकमंत्री श्री. प्रविण पोटे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. जयंत डेहनकर, शिवसेनेचे अमरावती विधानसभा संघटक श्री. नरेंद्र केवले, माजी खासदार श्री. अनंत गुढे, गायत्री नर्सरीचे मालक श्री. कांतीकुमार चौधरी, दैनिक हिंदुस्थानचे श्री. उल्हास मराठे, रंगोली पर्ल हॉटेल चे मालक श्री. नितीन देशमुख यांसह विविध मान्यवरांना राखी बांधण्यात आली.

आमदार श्री. पंकज भोयर यांचे औक्षण करतांना सौ. विजया भोळे
भारतीय जनता पक्षाचे अमरावती जिल्हाध्यक्ष श्री. जयंत डेहनकर यांचे औक्षण करतांना सनातन संस्थेच्या सौ. विभा चौधरी

वर्धा : येथील लोकप्रतिनिधी आणि पत्रकार यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राख्या बांधण्यात आल्या. या वेळी भाजपचे आमदार श्री. पंकज भोयर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अतुल शेंडे, बजरंग दलाचे अनिल कावळे, गोरक्षा समितीचे श्री. पवन गाहत्रे, शिवमंदीर उत्सव समिती, बोरगावचे अध्यक्ष श्री. चंद्रदेव यादव, व्यावसायिक ललित गांधी, दैनिक पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी रमेश निमजे, दैनिक भास्करचे चंद्रप्रकाश दुबे, दैनिक जनसंग्रामचे नीरज त्रिपाठी, दैनिक लोकमतचे श्री. अभिनव खोपडे तसेच देशोन्नती, लोकमत समाचार आदी वर्तमान पत्रांच्या प्रतिनिधींना राखी बांधण्यात आली.

जयंत डेहनकर यांचा सनातनच्या कार्याविषयी असलेला ठाम विश्‍वास !

सनातन संस्थेच्या साधकांना मी बर्‍याच वर्षांपासून ओळखतो. सनातनचे कार्य अतिशय प्रामाणिक आणि सत्याचे आहे. तुम्ही समाजाला धर्मशिक्षण देण्याचे कार्य करता, हे आम्हाला माहिती आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *