भाजपच्या राज्यात हिंदूंना त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन का करावे लागते ?
इंदूर (मध्यप्रदेश) : येथील प्रशासनाने बंगाली कॉलनीमध्ये रहाणार्या हिंदूंच्या प्रमुख मागण्यांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे सर्व हिंदू कल्याण आणि उत्थान समितीने नुकतेच येथे धरणे आंदोलन केले. हिंदूंच्या धर्मस्थळाभोवती भिंत बांधणे, शाळेसाठीच्या ५ एकर भूमीची मोजणी करणे, स्थानिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आणि मलनिःसारण व्यवस्था करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर २ सप्टेंबरला आमरण उपोषण करू, असेही या वेळी घोषित करण्यात आले. या वेळी समितीचे अध्यक्ष श्री. विनोद मिश्रा, पू. उमेश आनंद, भारत रक्षा मंचचे अधिवक्ता श्री. देवेंद्र पेंडसे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश व्हनमारे, हिंदु महासभेचे श्री. जितेंद्र सिंह ठाकूर, तसेच श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान आणि शिवसेना यांचे प्रतिनिधी, तसेच ३०० धर्माभिमानी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात